विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करू, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ग्वाही दिली.Strict action against those running dance bars under the name of Orchestra Bar; Chief Minister assures in the Assembly
विधानसभेत भास्कर जाधव यांनी पनवेल मधल्या डान्सबारच्या प्रकरणांचा उल्लेख केला त्यांच्यावर कठोर कारवाई करायची मागणी केली. सगळ्या विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी सुद्धा ही मागणी उचलून धरली.
A provision will be included in the law to take strict action against those who repeatedly violate the rules and run dance bars illegally.
कायद्यामध्ये तरतूद करून नियमांचे पुन्हा-पुन्हा उल्लंघन करत डान्स बार चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
(विधानसभा, मुंबई | दि. 24… pic.twitter.com/zcvLj1zjF4
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2026
आमदारांच्या या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या डान्सबारची कायदेशीर परिस्थिती समजून सांगितली. महाराष्ट्र विधानसभेने तीन वेळा डान्सबार विरोधी कायदा केला. मात्र सुप्रीम कोर्टाने कुठल्या ना कुठल्या कारणाने त्या कायद्यातल्या काही तरतुदींना स्थगिती दिली किंवा त्या बेकायदा ठरविल्या. परंतु महाराष्ट्र विधानसभेने वेगवेगळ्या सरकारच्या काळात डान्सबार विरोधात कठोर कायदे केले सध्या त्या कायद्याची अंमलबजावणी सुरूच आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्रात ऑर्केस्ट्रा बारची परवानगी आहे. त्या बारमध्ये महिलांना सुद्धा काम करण्याची परवानगी आहे, पण तिथे कोणी डान्सबार चालवला आणि पैसे उधळण्याचे प्रकार झाले, तर मात्र त्या प्रकारांना कायदेशीर बंदी आहे. कारण सुप्रीम कोर्टाने या प्रकारांची बंदी उठवलेली नाही. पनवेल सारख्या ठिकाणी आर्केस्ट्रा बारच्या नावाखाली जर डान्सबार सुरू असतील, तर सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करेल. बारचालक वारंवार कायद्याचे उल्लंघन करून डान्सबार चालवत असतील तर त्यांचे लायसन्स कायमचे रद्द करण्याची सुद्धा तरतूद करता येऊ शकेल त्यासंदर्भात विधानसभेने जरूर विचार केला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Strict action against those running dance bars under the name of Orchestra Bar; Chief Minister assures in the Assembly
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांचे गुणवर्णन करताना मुख्यमंत्र्यांना महाकवी भास आणि कवी पी. सावळाराम यांच्या काव्याची आठवण
- Kishtwar : किश्तवाडमध्ये 2 जैश दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलांनी अतिरेक्यांचे तळ उडवले
- MSRTC : राज्य परिवहन मंडळाची घोषणा- आता ‘गाव तिथे एसटी’ नव्हे, ‘आदिवासी पाडा तिथे एसटी’
- राहुल गांधींच्या नेतृत्वात मणिशंकर अय्यर यांचा दुसरा खोडा; INDI आघाडीचे नेतृत्व दुसऱ्या नेत्याकडे सोपवायची केली मागणी



Post Your Comment