वृत्तसंस्था
नवी दिल्ली :Shiv Sena शिवसेना पक्षचिन्ह वादावरील पुढील सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. हे प्रकरण न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर 16 नंबरला सुनावणीसाठी आले होते. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी खंडपीठाकडे पुढील तारीख मागितली. सिब्बलांच्या मागणीनंतर सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणीसाठी 12 नोव्हेंबर तारीख दिली.Shiv Sena
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह “धनुष्यबाण” आणि पक्षनाव “शिवसेना” हे एकनाथ शिंदे गटाला दिले होते. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. याआधी न्यायालयाने या प्रकरणावर काही प्राथमिक सुनावण्या घेतल्या असून, आता अंतिम टप्प्याकडे सुनावणी पोहोचत आहे.Shiv Sena
कोर्टात काय घडले?
आज न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होताच ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. सिब्बल यांनी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. “जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी,” असे त्यांनी कोर्टात सांगितले.
सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असताना दुसरे वकील वारंवार मध्यस्थी करत असल्याने त्यांना थांबवले. “आधीच खूप वेळ गेला आहे, आता सुनावणी घ्या,” असे त्यांनी न्यायालयासमोर आग्रहाने म्हटले. या युक्तिवादासाठी सिब्बल यांनी कमीत कमी 45 मिनिटांचा वेळ मागितला. यावर न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली. आता या प्रकरणावर 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी अंतिम युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.
विरोधकांनी तीन दिवसांचा वेळ मागितला
यासंदर्भात वकील असीम सरोदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. न्यायालयासमोर वेगवेगळ्या प्रकारची कामे आहेत. अर्धवट सुनावणी पूर्ण करणे, हे वैध कारण आहे. ते कारण मुद्दामहून दिल्याचे आपण म्हणू शकत नाही. योग्य कारणासाठी आज वेळ नसल्याचे सांगत कोर्टाने तातडीने सुनावणी न घेता पुढील तारीख दिली. विरोधकांच्या वकिलांनी तीन दिवसांचा वेळ मागितला होता. तर ठाकरेंचे कपिल सिब्बल यांनी 45 मिनिटे मागितली होती. तसेच स्थानिक निवडणुकांचा संदर्भ देत सुनावणी आज घेण्याबाबत आग्रह करण्यात आला, पण या निवडणुका जानेवारीमध्ये असल्यामुळे त्याआधी आपण ही सुनावणी घेऊ असे कोर्टाने सांगितले. त्यानंतर ते 19 नोव्हेंबर तारीख देणार होते, पण 12 नोव्हेंबर तारीख देण्यात आली.
12 नोव्हेंबर रोजी युक्तीवाद सुरू करणार असल्याचे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. न्यायिक व्यवस्थापनामध्ये तारखा कोणत्या द्यायच्या हे आपण त्यांना सांगू शकत नाही. आज त्यांनी 12 नोव्हेंबरपासून सुनावणी असे सांगितले आहे. त्यामुळे 12, 13, 14 असे दोन तीन दिवसांत सुनावणी होईल असा त्याचा अर्थ आहे.
नेमके प्रकरण काय?
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाने जुलै महिन्यातच न्यायालयात याचिका दाखल करून “शिवसेना नाव आणि चिन्हाच्या वादावर लवकर निर्णय द्या” अशी मागणी केली होती. त्यावर त्यावर 14 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. ही सुनावणी करताना न्या. सूर्यकांत, न्या. बागची यांच्या खंडपीठाने मुख्य याचिकेवर सुनावणी करणे योग्य राहील असे सांगत ऑगस्टमध्ये यावर सुनावणी घेऊ असे स्पष्ट केले होते. मात्र राष्ट्रपती-राज्यपाल वादातील खटल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर पडली. आता आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी अंतिम निर्णयासाठी आली, पण आता ती पुढे ढकलण्यात आली आहे.
Shiv Sena Symbol Dispute: Supreme Court Hearing Postponed to November 12 on Uddhav Thackeray Group’s Request
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस; आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते मेट्रोचे उद्घाटन!!
- Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
- Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते
- डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!
Post Your Comment