Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Sharad Pawar : 1967 नंतर पहिल्यांदाच शरद पवार मतदानापासून वंचित; प्रकृतीमुळे बारामतीला येणे अशक्य; सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचे आवाहन

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एक ऐतिहासिक आणि भावूक घडामोड समोर आली आहे. १९६७ मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत कधीही आपला मतदानाचा हक्क न चुकवणाऱ्या शरद पवार यांना यंदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानापासून दूर राहावे लागणार आहे. ही माहिती स्वतः शरद पवार यांनी सोशल मीडियाद्वारे दिली असून, त्यांनी बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sharad Pawar  बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एक ऐतिहासिक आणि भावूक घडामोड समोर आली आहे. १९६७ मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत कधीही आपला मतदानाचा हक्क न चुकवणाऱ्या शरद पवार यांना यंदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानापासून दूर राहावे लागणार आहे. ही माहिती स्वतः शरद पवार यांनी सोशल मीडियाद्वारे दिली असून, त्यांनी बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले आहे.Sharad Pawar

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभेच जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक होत असून, सुनेत्रा पवार महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे बारामतीत आज सुनेत्रा पवारांसाठी भव्य सांगता सभा पार पडली. या सभेला महायुतीतील तिन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांसह शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली होती. शरद पवार मात्र प्रकृती ठीक नसल्याने ते प्रचार सभेला येऊ शकले नाही. त्यातच आता आपण पोटनिवडणुकीत मतदान करू शकणार नसल्याचे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले.Sharad Pawar



शरद पवार यांची सोशल मीडिया पोस्ट जशास तशी

शरद पवार म्हणाले, मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत आहे.

या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजुन घेतील याची मी खात्री बाळगतो, असे शरद पवार यांनी म्हटले.

आमच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे. स्व. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे शरद पवार म्हणाले. बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे. ते या आवाहनास प्रतिसाद देतील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणुक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली. परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचे राज्याच्या निवडणुक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अखेर अतिशय व्यथित व जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला. या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावे, असे आवाहन शरद पवार यांनी बारामतीकरांना केले आहे.

Historical Shift in Baramati: Sharad Pawar to Miss Voting Since 1967

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment