Trending News

No trending news found.

Saturday, 7 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

संथाल आदिवासींची ममता बॅनर्जींना एलर्जी; प्रोटोकॉल तोडून राष्ट्रपतींचा कार्यक्रमही ठेवला छोटेखानी; राष्ट्रपतींनी व्यक्त केली तीव्र नाराजी!!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राजकीय अहंकार आज कळसाला पोहोचला. केंद्र सरकार विषयीचा आकस आता राष्ट्रपतींपर्यंत येऊन ठेपलेला दिसला.

नाशिक : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राजकीय अहंकार आज कळसाला पोहोचला. केंद्र सरकार विषयीचा आकस आता राष्ट्रपतींपर्यंत येऊन ठेपलेला दिसला. त्यांनी या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात प्रोटोकॉल तोडलाच होता, पण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमातही प्रोटोकॉल तोडला. संथाल आदिवासींची सुद्धा आपल्याला एलर्जी असल्याचे ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिले.

– संथाल आंतरराष्ट्रीय परिषद

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होत्या. त्यामध्ये त्यांचे दोन कार्यक्रम होते. त्यापैकी पहिला कार्यक्रम संथाल आंतरराष्ट्रीय परिषदेचा होता. सिलिगुडी मधल्या महाकमा इथल्या फासीदेव इथे ही परिषद आयोजित केली होती. पण या परिषदेचे कार्यक्रम स्थळ एवढे छोटे होते, की तिथे 5000 लोक सुद्धा नीटपणे उपस्थित राहू शकले नाहीत. वास्तविक राष्ट्रपतींचा कार्यक्रम खूप आधी ठरला होता. त्याचा प्रोटोकॉलही नेहमीप्रमाणेच ठरलेला होता. त्यामुळे खुद्द ममता बॅनर्जी, राज्यपाल आणि अन्य मंत्री सुद्धा राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला हजर राहणे अपेक्षित होते. पण यापैकी कोणीही संथाल आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहिले नाही. केवळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तिथे हजर राहिल्या.

– राष्ट्रपतींची तीव्र नाराजी

संथाल आंतरराष्ट्रीय परिषदेची ही दुरवस्था बघून राष्ट्रपतींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मी सुद्धा पश्चिम बंगालची कन्या आहे. ममता बॅनर्जी या माझ्या धाकट्या बहीण आहेत, पण त्यांनी संथाल आदिवासी परिषद एवढ्या छोट्या जागेत का भरविली??, हे मला समजत नाही. त्यांना कदाचित ही परिषद भरवायची नसेल, लोक या कार्यक्रमाला यावेत, असे त्यांना वाटत नसेल, पण तुम्ही सगळे या कार्यक्रमाला जमलात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.



– मोदींच्या कार्यक्रमातही तोडला होता प्रोटोकॉल

पण ममता बॅनर्जी यांच्या केंद्र सरकार विषयीचा आकस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात देखील दिसला होता. मोदी पश्चिम बंगाल मध्ये मध्ये पूरस्थितीची पाहणी करायला आले, तेव्हा मोदींच्या दौऱ्यात ममता बॅनर्जी स्वतः सहभागी झाल्याच नव्हत्या. मोदींनी घेतलेल्या बैठकीला त्यांनी कुठला मंत्री सुद्धा हजर ठेवला नव्हता. केवळ सरकारी अधिकारी मोदींच्या बैठकीला हजर राहिले आणि त्यांनी मोदींना ब्रीफिंग दिले होते.

– माणुसकीचाही गाठला तळ

ममता बॅनर्जी यांनी आज त्या पाठोपाठ संथाल आंतरराष्ट्रीय परिषदेविषयी अनास्था दाखवत राष्ट्रपतींचाही प्रोटोकॉल तोडला. बंगालमध्ये दोन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका असताना ममता बॅनर्जींचा राजकीय अहंकार असा टोकाला गेलेला दिसला. पण त्यापेक्षाही त्यांच्या केंद्र सरकार विषयीच्या आकसने आज प्रोटोकॉल, राजकीय सभ्यता आणि माणुसकीच आहे तळ गाठला.

Santhal tribals allergic to Mamata Banerjee

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment