Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Rohit Pawar : हा भोंदू महाराष्ट्रात दिसता कामा नये; आमदार रोहित पवार संतापले- ‘भोंदू बागेश्वर’ म्हणत बंदीची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा उल्लेख 'भोंदू' असा करत त्यांच्यावर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी केली आहे. शिवराय थकले व राजपाट समर्थांकडे दिला हे भोंदू बागेश्वर यांचे विधान अत्यंत संतापजनक आहे. ते पुन्हा महाराष्ट्रात दिसता कामा नये. त्यांच्यावर राज्यात बंदी घातली पाहिजे, असे ते आपला संतप्त सूर आळवत म्हणालेत.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Rohit Pawar राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा उल्लेख ‘भोंदू’ असा करत त्यांच्यावर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी केली आहे. शिवराय थकले व राजपाट समर्थांकडे दिला हे भोंदू बागेश्वर यांचे विधान अत्यंत संतापजनक आहे. ते पुन्हा महाराष्ट्रात दिसता कामा नये. त्यांच्यावर राज्यात बंदी घातली पाहिजे, असे ते आपला संतप्त सूर आळवत म्हणालेत.Rohit Pawar

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा नागपुरात एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते असा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी या विधानाप्रकरणी बागेश्वर बाबा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यात आता आमदार रोहित पवारांची भर पडली आहे. त्यांनी बागेश्वर बाबा यांचा उल्लेख भोंदू असा करत असे लोक महाराष्ट्रात यापुढे दिसता कामा नये, त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे, असी मागणी केली आहे.Rohit Pawar



फुले – शाहू – आंबेडकरांच्या विचारांना गालबोट

रोहित पवार म्हणाले, “शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला,” हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती. वारंवार अशाप्रकारची वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला, छत्रपतींच्या इतिहासाला, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावून महापुरुषांचं महत्व कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम तर राबवला जात नाही ना? अशी शंका येते.

भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते याचं जास्त दुःख वाटतं. शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढं महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल. सरकार या भोंदूवर कारवाई करेल असं वाटत नाही. त्यामुळं ‘सहन करत दुर्लक्ष करायचं की धडा शिकवायचा’, हे आता शिवप्रेमी जनता आणि या सर्व महामानवांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांनीच ठरवायला हवं, असे ते म्हणाले.

आत्ता पाहू काय म्हणाले होते धीरेंद्र शास्त्री?

धीरेंद्र शास्त्री आपल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या कथित भेटीवर भाष्य करताना म्हणाले होते, सततच्या युद्धामुळे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा खूप थकले, तेव्हा ते एकेदिवशी रामदास स्वामी यांच्याकडे गेले. तिथे त्यांनी आपला मुकूट काढला आणि म्हणाले, आम्ही खूप युद्ध लढले. आता आम्हाला आणखी लढायचे नाही. आता आमच्यावर एक मोठी दया करा, हा माझा मुकूट तुम्ही सांभाळा. हा राजपाठही तुम्हीच सांभाळा. तुमच्या आज्ञेनेच आम्ही इथपर्यंत वाटचाल केली. आता आम्हाला चालणे अवघड झाले आहे.

आता आम्हाला युद्ध लढणेही होत नाही. आता आम्ही खूप थकलो. आता आम्हाला विश्रांतही हवी आहे. आता आम्हाला आराम करायचा आहे. आता आम्हाला काही दिवस काहीच करायचे नाही, असे शिवाजी महाराज रामदास स्वामींना म्हणाले. त्यावर रामदास स्वामींनी त्यांची समजूत काढली आणि त्यांना उपदेश केला, असे बागेश्वर बाबा म्हणाले.

Ban This Fraud”: Rohit Pawar Slams Bageshwar Baba Over Shivaji Maharaj Remarks

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment