Trending News

No trending news found.

Friday, 17 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

राजेंद्र पवारांनी अजितदादांना दिले प्रत्युत्तर; पवारांच्या भावकीतल्या भांडणाची धुणी आली चव्हाट्यावर!!

महाराष्ट्राच्या राजकारणात गावकी भावकीने नेहमीच धुमाकूळ घातला. राजकारणाच्या धबडग्यात अनेकांच्या भावक्या फुटल्या. अनेक भावांनी परस्पर विरोधी मार्ग धरले. पण पवार घराण्याने मात्र आपण अजूनही एक असल्याचे दाखविले होते.

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात गावकी भावकीने नेहमीच धुमाकूळ घातला. राजकारणाच्या धबडग्यात अनेकांच्या भावक्या फुटल्या. अनेक भावांनी परस्पर विरोधी मार्ग धरले. पण पवार घराण्याने मात्र आपण अजूनही एक असल्याचे दाखविले होते. पण आता पवारांच्या भावकीतल्या भांडणाची धुणी सुद्धा धुवायला चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. भावकीने लक्ष घातले म्हणून तू निवडून आलास बेट्या असा टोमणा अजित पवारांनी रोहित पवारला हाणला होता. त्यावर आज रोहित पवारचे वडील राजेंद्र पवार यांनी अजितदादांना प्रतिटोला हाणला.

पवार घराण्यात आजवर प्रत्येक काकाने पुतण्याला मदत केली आहे. किंबहुना ती पवार घराण्याची परंपराच आहे, असे वक्तव्य रोहितचे वडील राजेंद्र पवार यांनी केले. काही दिवसांपूर्वी सांगलीतील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी रोहित पवार यांना शा‍ब्दिक चिमटा काढला होता. आपण पोस्टल मतांवर निवडून आलोय, हे लक्षात ठेवावं. भावकीने लक्ष घातलं नसतं तर तू निवडून आला नसता, असा टोला अजित पवार यांनी रोहित पवारांना लगावला होता.

या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार यांनी बुधवारी बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी अजित पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.

सुरुवातीच्या काळात अजित पवार ज्यावेळी निवडणूक लढले होते. तेव्हा माझ्या वडिलांनी म्हणजे आप्पासाहेबांनी त्यांना मदत केली होती. नवख्या माणसाला किती मतदान पडतं आपल्याला माहिती आहे. परंतु, त्यानंतर अजित पवार यांनी 35 वर्षे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्त्व केले. काहीजण पोस्टल मतावरती निवडून आले असले तरी काळ आणि वेळ बदलते, असे राजेंद्र पवार यांनी सांगितले.



अजितदादांमुळे गेली संधी

छत्रपती सहकारी साखर कारखान्याला निवडणुकीत वडील माझा विचार करतील असं मला वाटलं होतं. परंतु आमच्या सगळ्या काकांना पुतण्याच दिसतो. तिथेदेखील मला बघितलं नाही त्यावेळी माझ्या वडिलांनी अजितदादांना संधी दिली. मला तिसऱ्यांदा संधी मिळाली पण त्यावेळेस देखील मला सांगितलं गेलं की, सगळ्यांनीच राजकारणात यायचं नसतं. तेव्हा मला त्यांचं बोलणं पटलं, मग मी शांत बसलो. त्यावेळेस मला माहिती नव्हतं की, संधी असते त्यावेळेस खेचून घ्यायची असते. मला कारखान्याला संधी दिली नाही. त्यानंतर वाटलं असेल की हा कारखाने काढेल. जळगावला काढेल, नगरला काढेल, मराठवाड्यात काढेल, बारामतीच्या आसपास काढेल आणि त्यामुळे माझ्या काकांनी मला संधी दिली नाही आणि मी आता इथे तुम्हाला एआय तंत्रज्ञान काय आहे सांगायला उभा राहिलो आहे. भविष्यात एआय तंत्रज्ञानाशिवाय गत्यंतर नाही.

अख्ख्या राज्याला किस्सा माहिती आहे. आम्ही गाई आणायला गेलो, त्यावेळी अजितदादा केबिनमध्ये बसले आणि मी पाठीमागे गाईच्या शेपटाजवळ बसलो. दादा पुढच्या केबिनमधून पुढच्या केबिनमध्ये, पुढच्या केबिनमध्ये, पुढच्या केबिनमध्ये गेले, मात्र आम्ही तिथेच मागे राहिलो. दादांना गायींचा व्यवसाय चांगला जमायचा. माझी गाय 3000 ला गेली की दादांची गाय 9000 ला जायची, असे राजेंद्र पवार यांनी सांगितले.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे महत्व

संघटनावाल्यांना मला काय म्हणायचं नाही. त्यांचे ते काम करतात. पण मला तरी वाटत नाही की, शेतमालाचा भाव वाढेल. स्वस्तवाल्यांना जास्त लोक मतदान करतात, सरकार आयुष्यात ठोस निर्णय घेऊ शकत नाही. पाणी जर जास्त दिलं तर पुढच्या पिढीला जमिनी राहणार नाहीत. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव एवढा असेल की, पुढच्या आठ दहा वर्षात शाळेत शिकवायला शिक्षक नसतील, गाडी चालवायला ड्रायव्हर नसतील. 2040 मध्ये मेंदूदेखील बदलला जाणार आहे. त्यामुळे राजकारण देखील तसेच असणार आहे.

इथे राज्यकर्ते स्टेजवर आहेत. मला कुणाला नावे ठेवायची नाहीत. माळेगाव मध्यवर्ती संशोधन केंद्राने 265 सारखी उसाची जात काढून टनाटनाने महाराष्ट्राचे साखर वाढवली. पण त्या पाडेगाव संशोधन केंद्राकडे बघायला कोण तयार नाही. विद्यापीठाला नावे ठेवू नका. त्यांना आपल्याला मदत करणे गरजेचे आहे. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते का नाही, हा तुमचा विषय आहे. कृषीमंत्र्यांना मला सांगायचं आहे. महाराष्ट्रात एका एका स्क्वेअर फुटाचे देखील मापन झाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी, नागपूर भागात त्याला तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे. सबसिडीसाठी जो थांबतो कधी यशस्वी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सबसिडीसाठी थांबू नका, असे राजेंद्र पवार यांनी सांगितले.

Rajendra Pawar gave a reply to Ajitdada; The fight between Pawar’s brothers came to light!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment