Trending News

No trending news found.

Tuesday, 9 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

राज ठाकरेंची आज शिवतीर्थावर गर्जना; उद्धव सेनेशी युतीनंतरचा पहिला गुढीपाडवा मेळावा; मोठ्या घोषणेची अपेक्षा!!

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती केल्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला गुढीपाडवा मेळावा होणार असून मनसैनिकांनी त्याची जोरदार तयारी केली आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती केल्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला गुढीपाडवा मेळावा होणार असून मनसैनिकांनी त्याची जोरदार तयारी केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहेत. हा मेळावा पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात असून, यातून पुढील राजकीय दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. Raj Thackeray



– उद्धव सेनेशी युतीनंतर पहिला मेळावा

या मेळाव्यात राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या भाषणातून पक्षाची आगामी भूमिका, निवडणुकांची रणनीती आणि संघटनात्मक बदल याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेष म्हणजे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीनंतर हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा असल्यामुळे, राज ठाकरे हे या युतीबाबत ते नेमके काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मेळाव्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून मैदानावर मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभारण्यात आली आहे. दोन मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत, ज्यावर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. या स्क्रीनवर कोणते व्हिडिओ दाखवले जाणार याबाबतही उत्सुकता आहे. सायंकाळी 6.00 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार असून त्यानंतर राज ठाकरे यांचे भाषण होईल.

सभेतून महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता

याआधी झालेल्या पदाधिकारी बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी रायगडावर जाऊन मनसेच्या सभासद नोंदणीची सुरुवात सुद्धा केली होती. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आगामी काळात पक्ष कोणती भूमिका घेणार, तसेच युतीनंतरची राजकीय समीकरणे कशी असतील, याबाबत महत्त्वाचे संकेत या सभेतून मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आजच्या या मेळाव्याकडे लागले आहे.

Raj Thackeray Gudhipadva Melava at ‘Shivtirth’ Today

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment