Trending News

No trending news found.

Saturday, 7 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वविक्रम, इन्स्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स

तरुणाईच्या पसंतीचे सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तरुणाईचा प्लॅटफॉर्म मानल्या जाणाऱ्या इन्स्टाग्रामवर मोदींनी 10 कोटी फॉलोअर्सचा विक्रम केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी मागे टाकले आहे. 2014 मध्ये त्यांनी इन्स्टाग्रामवर खातं उघडलं होतं. एका तपात तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनत त्यांची लोकप्रियता शिखरावर पोहचली.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: तरुणाईच्या पसंतीचे सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तरुणाईचा प्लॅटफॉर्म मानल्या जाणाऱ्या इन्स्टाग्रामवर मोदींनी 10 कोटी फॉलोअर्सचा विक्रम केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी मागे टाकले आहे. 2014 मध्ये त्यांनी इन्स्टाग्रामवर खातं उघडलं होतं. एका तपात तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनत त्यांची लोकप्रियता शिखरावर पोहचली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर 100 दशलक्ष म्हणजे 10 कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. असा जागतिक रेकॉर्ड करणारे ते एकमेव नेते आहेत. 2014 मध्ये पंतप्रधानांनी इन्स्टाग्राम खाते उघडले होते. तेव्हापासून त्यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता वाढत गेली.



 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेकदा संवाद साधतात. विविध विषयांवर त्यांचे विचार मांडतात. इन्स्टाग्राम हा तरुणाईचा प्लॅटफॉर्म मानला जातो. त्यामुळे तरुणांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख अधोरेखित झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या काळात डिजिटल इंडियाने मोठी भरारी घेतली. 2014 ते 2026 पर्यंत कोट्यवधी भारतीयांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट आले.

मोदी यांच्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा क्रमांक आहे. त्यांचे 43.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे 15 दशलक्ष, ब्राझीलचे राष्ट्रपती लूला हे 14.4 दशलक्ष, तुर्कीचे राष्ट्रापती रजब तैयप एर्दोगान यांचे 11.6 दशलक्ष तर अर्जेंटिनाचे राष्ट्रपती जेवियर मिलेई यांचे 6.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्टाग्रामवर आतापर्यंत 1205 पोस्ट केल्या आहेत. पंतप्रधान इन्स्टाग्रामवर कुणालाच फॉलो करत नाहीत. पण त्यांना फॉलो करणाऱ्यांचा आकडा हा 10 कोटींच्या पुढे गेला आहे. पंतप्रधान मोदी यांना फॉलो करणाऱ्यांचा आकडा 10 कोटीहून अधिक आहे.

Prime Minister Narendra Modi Sets World Record on Instagram with 100 Million Followers, Surpasses Donald Trump

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment