Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी – एकनाथ शिंदे भेटीवरून नुसती पतंगबाजी; पण खरा राजकीय भूकंप अशा उघड भेटीतून घडतो का??

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राजधानी नवी दिल्लीत जाऊन शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली त्यानंतर काही निवडक शिवसेना खासदारांसमावेत त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी आणि शिंदे यांच्या भेटीवर विरोधकांसह मराठी पत्रकारांनी जोरदार राजकीय पतंगबाजी केली. त्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून ते ऑपरेशन टायगर पर्यंत वेगवेगळे विषयांचे पतंग सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय हवेत उडवून घेतले.

नाशिक : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राजधानी नवी दिल्लीत जाऊन शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली त्यानंतर काही निवडक शिवसेना खासदारांसमावेत त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी आणि शिंदे यांच्या भेटीवर विरोधकांसह मराठी पत्रकारांनी जोरदार राजकीय पतंगबाजी केली. त्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून ते ऑपरेशन टायगर पर्यंत वेगवेगळे विषयांचे पतंग सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय हवेत उडवून घेतले. पण देशातला किंवा महाराष्ट्रातला कुठलाही खरा राजकीय भूकंप असा उघड भेटीगाठींमधून घडतो का??, एवढा साधा सवाल देखील या राजकीय पतंगबाजांच्या मनात आला नाही.Prime Minister Narendra Modi – Eknath Shinde meeting; But does a real political earthquake happen through such an open meeting??

– एकनाथ शिंदेंचा खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपण सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे खासदार माझ्याबरोबर होते. संसदेचे अधिवेशन सुरू असताना मी नेहमीच दिल्लीत येतो. बैठक आणि भेटीगाठी घेतो तशीच आजची बैठक आणि पंतप्रधान मोदींची भेट‌ होती, असा स्पष्ट खुलासा एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर केला.



– राजकीय भूकंपाचे पोकळ भाकीत

पण विरोधक आणि पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांच्या थेट वक्तव्यावर विश्वास न ठेवता महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप घडणार असल्याचे भाकीत करून टाकले. एकनाथ शिंदे लवकरच ऑपरेशन टायगर राबवतील उद्धव ठाकरे यांचे निवडक एक दोन खासदार वगळता बाकीचे सात – आठ खासदार आपल्या शिवसेनेच्या गळाला लावतील त्यासाठीच मोदींची परवानगी घेण्यासाठी ते त्यांना भेटले, असा दावा अनेक मराठी पत्रकारांनी केला. पण या दाव्याला ते कुठलाही पुरावा सादर करू शकले नाहीत.

– नुसतीच पतंगबाजी, पुरावा शून्य

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत त्या फेरबदलामध्ये शिवसेनेला विशिष्ट स्थान मिळावे ऑपरेशन टायगर राबविले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून आपल्याकडे आलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेत स्थान मिळावे, या दोन मागण्यांसाठी एकनाथ शिंदे नरेंद्र मोदींना भेटले असा दुसरा दावाही मराठी पत्रकारांनी केला पण या दुसऱ्या दाव्याला सुद्धा त्यांनी कुठलाही पुरावा सादर केला नाही.

– मोदी स्वतंत्र वृत्तीचे पंतप्रधान

पण मूळात नरेंद्र मोदी यांच्या सरकार स्वतंत्र वृत्तीचे पंतप्रधान स्वतःच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात इतर पक्षांच्या नेत्यांना विशिष्ट मर्यादेपलीकडे विचारतील का??, असा साधा सवाल सुद्धा या मराठी पत्रकारांना पडला नाही. महाराष्ट्रात खरोखरच राजकीय भूकंप घडवायचा असेल तर कुठलाही नेता पंतप्रधानांची किंवा गृहमंत्र्यांची अशी उघड भेट घेतो का??, एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांनी अशा उघड भेटी घेऊन आपापल्या पक्षांमध्ये बंड केले का??, असे सवाल सुद्धा पतंगबाज पत्रकारांच्या मनात आले नाहीत. त्यामुळे त्या सवालांची उत्तरे शोधण्याचा प्रश्नही उद्भवला नाही.

शिंदे – अजितदादांचे बंड यशस्वी का झाले??

मूळात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अतिशय गुप्तपणे भेटीगाठी घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची परवानगी घेऊनच आपापल्या पक्षांमध्ये बंड केले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा भक्कम पाठिंबा राहिल्यानेच त्या दोघांचेही बंड यशस्वी झाले. पण ही बंडे करताना त्यांनी कुठली पतंगबाजी केली नाही, किंवा पतंगबाज पत्रकारांना कुठलाही सुगावा लागू दिला नाही, म्हणूनच या दोघांचीही बंडे यशस्वी झाली. अन्यथा ती बंडे डब्यात गेली असती.

पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडांचा आधी आपल्याला सुगावा सुद्धा लागला नाही, या विषयी पतंगबाज मराठी पत्रकारांना साधी खंत सुद्धा वाटली नाही. म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या आजच्या दिल्ली भेटीविषयी नव्याने पतंग उडवायला त्यांनी सुरुवात केली. त्यापलीकडे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीचा कुठलाही वेगळा अर्थ सध्या तरी निघायची शक्यता नाही.

Prime Minister Narendra Modi – Eknath Shinde meeting; But does a real political earthquake happen through such an open meeting??

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment