Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Pratibha Chakankar : भोंदू अशोक खरातप्रकरणी प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी; ‘समता’मधील कोट्यवधींचे व्यवहार अन् सह्या बनावट असल्याचा दावा

नाशिकच्या गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास आता थेट राजकीय वर्तुळातील नातेसंबंधांपर्यंत पोहोचला असून, या प्रकरणातील चौकशीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलिस ठाण्यात तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली. समता पतसंस्थेतील कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहाराप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी धक्कादायक खुलासा करत, पतसंस्थेतील ती खाती बनावट असून सर्व सह्या खोट्या असल्याचा दावा केला आहे.

विशेष प्रतिनिधी

नाशिक :Pratibha Chakankar  नाशिकच्या गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास आता थेट राजकीय वर्तुळातील नातेसंबंधांपर्यंत पोहोचला असून, या प्रकरणातील चौकशीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलिस ठाण्यात तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली. समता पतसंस्थेतील कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहाराप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी धक्कादायक खुलासा करत, पतसंस्थेतील ती खाती बनावट असून सर्व सह्या खोट्या असल्याचा दावा केला आहे.Pratibha Chakankar

समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे एकूण चार खाती असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यात प्रतिभा यांच्या नावे दोन आणि त्यांचा मुलगा चिन्मय याच्या नावे दोन खाती आहेत. विशेष म्हणजे, या खात्यांमधून आतापर्यंत सुमारे २ कोटी ४० लाख रुपयांची मोठी उलाढाल झाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या सर्व खात्यांवर वारसदार (नॉमिनी) म्हणून मुख्य आरोपी अशोक खरात याचे नाव नोंदवण्यात आले आहे. याच संशयास्पद व्यवहारांचा धागा पकडून पोलिसांनी चाकणकर माय-लेकांचा जबाब नोंदवला.Pratibha Chakankar



देवस्थानाच्या नावाखाली कागदपत्रांचा गैरवापर

चौकशीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिभा चाकणकर यांनी आपली बाजू स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “संबंधित खाती मी उघडलेली नाहीत, तसेच त्यावर असलेल्या माझ्या सह्या खोट्या आहेत. या खात्यांमधून आम्ही एक रुपयाचाही व्यवहार केलेला नाही. देवदर्शनाच्या बहाण्याने अशोक खरातने आमची कागदपत्रे घेतली होती आणि व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल्या त्याच कागदपत्रांचा गैरवापर करून ही बनावट खाती उघडली असावीत, असा दावा प्रतिभा चाकणकर यांनी केला.

दरम्यान, आपल्याला कोणतीही अधिकृत नोटीस मिळाली नव्हती, तरीही बातम्या पाहून आपण स्वतःहून जबाब देण्यासाठी पोलिसांसमोर हजर झालो, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

चुकीचा पत्ता अन् बनावट सह्या; वकिलांचा दावा

प्रतिभा चाकणकर यांच्या वकील जयश्री काळे-पालवे यांनी या प्रकरणातील तांत्रिक त्रुटींवर बोट ठेवले. “प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाच्या नावाने समता पतसंस्थेत बनावट खाती उघडण्यात आली आहेत. त्या कधीही या पतसंस्थेत गेल्या नाहीत. खाते उघडताना अर्जावर चुकीचा पत्ता वापरण्यात आला आहे. आम्ही पोलिसांना सह्यांचे नमुने दिले असून, पुढील तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य केले जाईल,” असे त्यांनी सांगितले.

पोलिस तपासाची दिशा

शिर्डी पोलिसांकडून आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. बनावट खाती उघडण्यासाठी पतसंस्थेच्या नियमांचे उल्लंघन झाले का? या कोट्यवधींच्या व्यवहारांचा मूळ स्रोत काय आहे? आणि यामागे कोणते मोठे नेटवर्क कार्यरत आहे? याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणातील धागेदोरे मोठे असण्याची शक्यता असून येत्या काळात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

8-Hour Interrogation of Pratibha Chakankar in Ashok Kharat Fraud Case

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment