Trending News

No trending news found.

Saturday, 10 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Prakash Mahajan : सत्ता आली तर दोघांच्या बायकांत भांडण लागेल, प्रकाश महाजन यांची राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई महापालिकेत उद्या सत्ता आली तर उद्धव आणि राज ठाकरे या दोघांच्या बायकांत भांडण लागेल, अशी टीका मनसेतून नुकतेच शिवसेना शिंदे गटात गेलेले नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना महाजन म्हणाले, राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची, सत्तेसाठी चावडी केली. सत्तेसाठी कोणत्या थराला चालले आहेत, हिंदुत्व कुठे आहे? चंदू मामा कुठे आणि रशीद मामूला त्यांनी जवळ केले.

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Prakash Mahajan  मुंबई महापालिकेत उद्या सत्ता आली तर उद्धव आणि राज ठाकरे या दोघांच्या बायकांत भांडण लागेल, अशी टीका मनसेतून नुकतेच शिवसेना शिंदे गटात गेलेले नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.Prakash Mahajan

राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना महाजन म्हणाले, राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची, सत्तेसाठी चावडी केली. सत्तेसाठी कोणत्या थराला चालले आहेत, हिंदुत्व कुठे आहे? चंदू मामा कुठे आणि रशीद मामूला त्यांनी जवळ केले.
प्रकाश महाजन यांनी संजय राऊत तसेच अभिनेते महेश मांजरेकर यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज्यात तीन वर्षांपूर्वी एक मुलाखत झाली, त्याचा हा सिक्वल आहे. त्या मुलाखतीत राज ठाकरे सहज नव्हते, चित्रपट सृष्टीतील कोणी नसेल तर एका संपादकाला मुलाखत दिली, असे म्हणत त्यांनी राऊतांवर टीका केली. तसेच महेश मांजरेकर यांना कशाची भीती? त्यांचे मित्र अन्डरवर्ल्डचे आहेत.Prakash Mahajan



मराठी माणूस हा त्यांच्या प्रचाराचा मुखवटा आहे, त्यांना मराठी माणसाची काळजी आहे म्हणून ते सोबत नाहीत. तीन वर्षापूर्वीच्या मिळकतीत काही बदल झाला नाही, त्यांची सत्ता येणार नाही हे 100 टक्के आहे. मुंबईत सत्ता महायुतीची येणार आहे. मराठीसाठी यांनी काय केले? असा सवाल प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला. राज ठाकरे हे उध्दव ठाकरे यांच्यासोबत जाऊन अनाडी नाहीत. आज मनसेतून लोक बाहेर पडत आहेत, पण मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी हे चालले आहे, असेही महाजन यांनी म्हटले.

संतोष धुरींनी मनसे सोडून भाजपात प्रवेश केला. यावर प्रकाश महाजन म्हणाले, राज ठाकरेंभोवती ठरावीक वर्तुळ आहे. संदीप देशपांडेही आनंदी नाही, धुरी यांनी संदीपला विचारल्याशिवाय ते बाहेर पडले नसतील. पन्नास खोके मला माहीत नाही. पण, एकनाथ शिंदे यांना एक खोके दिले आहे हे माहीत आहे. तुमचा विषय पैशाचा आहे. तुम्ही आरोप कोणावर करता. एकजण गुजरातला जातो, त्याच्या मागे जातीधर्माचे नाही तरीही पन्नास लोक बाहेर जातात, असे म्हणत एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीचेही महाजन यांनी समर्थन केले.

ठाकरे बंधूंना उद्देशून बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, मराठी हे बुजगावणे उभे केले आहे. हे मुंबईत कुठे जन्मले? ते एसीत जन्मले आहेत. निवडणुकीत यश मिळावे म्हणून मराठीचा मुद्दा काढला. कोहिनूर मिलमध्ये मराठी माणसाला काम देऊ म्हणाले, पण मायकल जॅकसनचा कार्यक्रम घेतला त्याचा हिशोब देत नाहीत, असेही महाजन म्हणाले.

If they come to power, there will be a fight between the wives of both, Prakash Mahajan criticizes Raj and Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment