विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : “भारताची कच्च्या तेलाची पुरवठा स्थिती सुरक्षित आहे,” असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज लोकसभेत सांगितले. पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीत भारताच्या ऊर्जा पुरवठ्याच्या परिस्थितीवर त्यांनी लोकसभेत निवेदन केले. युद्ध परिस्थितीत भारतात पेट्रोल, डिझेल, रॉकेल, एटीएफ किंवा इंधन तेलाची कोणतीही कमतरता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.petrol, diesel and fuel oil in India; Central Government’s statement in Lok Sabha
होर्मूजच्या खाडीतून वाहतूक करायला भारतीय जहाजांना
आखाता मधल्या होर्मूजच्या खाडीतून प्रवास करायला भारतीय जहाजांना इराणने परवानगी दिली. त्यामुळे आखातामधून भारताकडे येणाऱ्या गॅस आणि तेलाची वाहतूक सुरळीत व्हायला मदत होईल. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची मुत्सद्देगिरी यासाठी कामी आली.
अमेरिका विरुद्ध इराण या युद्धात सगळे जग होरपळत असताना भारताने मात्र संयमाची आणि संतुलित भूमिका घेऊन स्वदेश हित साधण्यावर भर दिला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराण, रशिया, फ्रान्स, जर्मनी या सर्व देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची फोनवरून बातचीत केली. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा अनेक देशांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा केली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बातचीत करताना होर्मूज खाडीतून भारतीय जहाजांना सेफ पॅसेज द्यावे, अशी सूचना केली. ती इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मान्य केली. त्यामुळे आखातामधून होणारी तेल आणि गॅसची वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता असून भारतातली गॅस टंचाई काही काळात दूर होऊ शकते.
– इराण आणि रशिया यांना प्राधान्य
तेल खरेदी संदर्भात भारताने नेहमीच इराण आणि रशिया यांना प्राधान्य दिले. या दोन्ही देशांच्या संकट काळात भारताने त्यांना मदत केली. त्यामुळे इराणने देखील भारताच्या मदतीची कदर करून युद्ध दरम्यान भारतीय जहाजांना होर्मूजच्या खाडीतून सेफ पॅसेज द्यायला मान्यता दिली. रशियाने काही किमती वाढवून भारताला पुन्हा तेल पुरवठा सुरू केला त्यामुळे इराण विरुद्ध अमेरिका या युद्धाची झळ भारताला बसली असली तरी त्या झळीची तीव्रता कमी करण्यात भारताला यश आले.
petrol, diesel and fuel oil in India; Central Government’s statement in Lok Sabha
महत्वाच्या बातम्या
- शेती क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांचा विधानभवनात सन्मान; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे
- RTE प्रवेशातील 1 किलोमीटर अंतराची जाचक अट रद्द; वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश
- Trump : अमेरिकेत 2 कोटी मतदारांची नावे वगळण्याची भीती; मतदान करण्यासाठी पासपोर्ट, जन्म दाखला आवश्यक
- Israel : लेबनॉनचा आरोप- इस्रायलने निवासी भागात पांढऱ्या फॉस्फरसचे गोळे डागले, अनेक लोक भाजले



Post Your Comment