Trending News

No trending news found.

Monday, 12 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

नेहरूंना सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातले योगदान मान्य, पण त्यांना भारतरत्न द्यायला विरोध!!; पुरावा समोर

भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातले महत्त्वाचे योगदान मान्य होते, पण त्यांना भारतरत्न किताब द्यायला विरोध होता, याचा ढळढळीत पुरावा बाकी कुठून नव्हे, तर थेट Nehru archives मधूनच समोर आला.

नाशिक : भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातले महत्त्वाचे योगदान मान्य होते, पण त्यांना भारतरत्न किताब द्यायला विरोध होता, याचा ढळढळीत पुरावा बाकी कुठून नव्हे, तर थेट Nehru archives मधूनच समोर आला.Pandit Nehru rejected Bharat ratn for Savarkar

सावरकरांना भारतरत्न किताब द्यायची मागणी काही आजची नाही. ती त्यांच्या हयातीतच संपूर्ण देशभरातून होत होती. परंतु, तत्कालीन नेहरू सरकार, इंदिरा सरकार किंवा राजीव सरकार आणि अगदी अटल बिहारी सरकार यांनी ही मागणी कधी मान्य केली नव्हती.

यातल्या नेहरू सरकारने सावरकरांना भारतरत्न द्यायची मागणी नाकारली होती, याचा ढळढळळीत पुरावा Nehru archives मधूनच समोर आला.



– पंजाब हिंदू महासभेकडून मागणी

1960 च्या दशकात पंजाब हिंदू महासभेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न किताब देण्याची मागणी करणारी पत्र तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पाठविले होते. राधाकृष्णन यांनी हे पत्र नेहरू सरकारच्या शिफारशीसाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे पाठविले होते. परंतु, त्या पत्राला उत्तर देताना जवाहरलाल नेहरूंनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या योगदानाविषयी गौरवोद्गार काढले, पण नंतर सावरकर वादग्रस्त व्यक्तिमत्व ठरल्याने त्यांना भारतरत्न किताब देणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. पंडित नेहरूंनी सावरकरांना भारतरत्न किताब देणे नाकारले. २ जून १९६३ रोजी पंडित नेहरूंनी राधाकृष्णन यांना हे पत्र लिहिले होते.

https://nehruarchive.in/documents/to-s-radhakrishnan-no-bharat-ratna-for-savarkar-2-june-1963-ngx2k

– सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातले योगदान मान्य

महत्त्वाचे म्हणजे पंडित नेहरूंनी सावरकरांना भारतरत्न किताब द्यायचे जरी नाकारले होते, तरी त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातले योगदान मात्र मान्य केले होते. नेहरूंनी सावरकरांना कुठेही आणि कधीही “माफीवीर” या शब्दाने हिणवले नव्हते. पंडित नेहरूंनंतर लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी या दोन पंतप्रधानांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी गौरव उद्गारच काढले होते. लालबहादूर शास्त्रींच्याच सरकारने सावरकरांना स्वातंत्र्य सैनिकाची ३०० रुपये पेन्शन मंजूर केली होती. इंदिरा गांधींनी सावरकर सिनेमासाठी आपल्या वैयक्तिक अकाउंट म्हणून ११००० रुपयांची देणगी दिली होती. पण एवढे सगळे असून सुद्धा नेहरूंच्या नंतरच्या चौथ्या पिढीतल्या काँग्रेसजनांमध्ये मात्र सावरकरांना “माफीवीर” म्हणून ठेवण्याची प्रथा परंपरा सुरू झाली.

मोदी सरकारने सावरकरांचा उचित गौरव करायला सुरुवात केली. स्वतः मोदींनी सावरकरांच्या अंदमनातल्या कोठडीत जाऊन ध्यानधारणा करून त्यांना आदरांजली वाहिली होती. पण मोदी सरकारने सुद्धा सावरकरांना अद्याप भारतरत्न किताब जाहीर केलेला नाही.

Pandit Nehru rejected Bharat ratn for Savarkar

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment