Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

तमिळ अस्मितेच्या राजकारणात राष्ट्रीय पक्षांची 12 % वर वाताहत!!

तमिळ अस्मितेच्या राजकारणात राष्ट्रीय पक्षांची 12 % वाताहत!!, हेच राजकीय चित्र आज अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि भाजप यांच्या युतीच्या जागा वाटपातून समोर आले.

नाशिक : तमिळ अस्मितेच्या राजकारणात राष्ट्रीय पक्षांची 12 % वाताहत!!, हेच राजकीय चित्र आज अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि भाजप यांच्या युतीच्या जागा वाटपातून समोर आले. त्याआधी द्रविड मुन्नेत्र कळघम आणि काँग्रेस यांच्या युतीच्या जागावाटपातून सुद्धा यापेक्षा वेगळे चित्र समोर आले नव्हते. Tamilnadu politics

– भाजपच्या वाट्याला फक्त 27 जागा

तामिळनाडू विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सात दिवसांनी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि भाजप यांच्यातल्या युतीच्या जागावाटपाची घोषणा तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि भाजपचे नेते पियुष गोयल यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन केली. या पत्रकार परिषदेला पटली मच्छल कच्ची या पक्षाचे नेते रामदास आणि मुरूमरलाची द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते दिनाकरन हे नेते सुद्धा हजर होते. या सगळ्यांमध्ये झालेल्या जागा वाटपानुसार अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम 200 जागा लढवणार असून भाजपच्या वाट्याला 27, पटली मच्छल कच्ची पक्षाच्या वाट्याला 18, दिनाकरन यांच्या पक्षाच्या वाट्याला पाच जागा आल्यात. Tamilnadu politics

या जागा वाटपाचे प्रमाण बघितले तर तमिळनाडूतल्या 234 पैकी फक्त 27 जागा भाजप नावाचा राष्ट्रीय पक्षाच्या वाट्याला आल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळनाडू प्रचारालाच येऊ नये आणि ते आमच्या राज्यात प्रचाराला आले तर त्यांच्या प्रचाराचा आम्हालाच फायदा होईल. भाजपला तोटा होईल. कारण मोदी तामिळ अस्मिता विरुद्ध बोलत राहतील, असा दावा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी केला होता. त्याचवेळी त्यांनी तामिळनाडूच्या राजकारणात द्रविडी narrative ला प्राधान्य आहे राष्ट्रीय पक्षांना इथे स्थान नाही, असे देखील सांगितले होते.



– काँग्रेसच्या वाट्याला फक्त 28 जागा

द्रविड मुन्नेत्र कळघमने देखील काँग्रेसला आपल्या आघाडीत घेतले आणि त्या पक्षाला फक्त 28 जागा दिल्या उरलेल्या 199 जागा द्रविड मुन्नेत्र कळघमने स्वतःकडे ठेवल्या. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला पाच जागा दिल्या. अन्य किरकोळ जागा छोट्या पक्षांना दिल्या.

– फक्त द्रविडी narrative ला प्राधान्य

पण या सगळ्या राजकारणाचा अर्थ हाच की तामिळनाडूच्या राजकारणात द्रविडी narrative ला प्राधान्य देताना दोन्ही आघाड्यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना फक्त 12 % स्थान ठेवले. त्यापलीकडे कुठलेही स्थान ठेवले नाही. राष्ट्रीय पक्षांना तामिळनाडू निवडून यायचे असेल, तर फक्त तामिळ अस्मितेच्या पक्षांचाच आधार घ्यावा लागेल, अन्यथा राष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांना निवडणूकच लढवता येणार नाही, अशी वातावरण निर्मिती यातून झाली.

– राष्ट्रीय पक्षांची झाली मांजरे

भाजप आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष तामिळनाडू वगळून विशेषत: दक्षिणेतील राज्य वगळून अन्यत्र प्रादेशिक पक्षांवर कुरघोडी करताना दिसले. याचे प्रतिबिंब बिहार महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये प्रामुख्याने उमटले. भाजपने बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलावर, तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे किंवा ठाकरे यांच्या शिवसेनेवर “दादागिरी” केली. पण तामिळनाडूतल्या प्रादेशिक पक्षांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना दादागिरी करायचे स्थितीपर्यंत सुद्धा येऊ दिले नाही. त्यांना तामिळ राजकारणातल्या एकूण टक्केवारीत देखील फक्त 12 % राजकारण करायची संधी ठेवली.

National political parties have only 12 % share in Tamilnadu politics

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment