संपूर्ण देशाची राजकीय कुस बदलून टाकणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या वर्षात संघ स्वयंसेवक नरेंद्र मोदी नावाच्या राज्यकर्त्याची पंचविशी आली, याकडे कुठल्या प्रसारमाध्यमांचे फारसे लक्षही गेले नाही. सगळे संघाची शताब्दी साजरी करण्यात मग्न राहिले. मग ते संघाचे समर्थक असोत, की विरोधक असोत सगळ्यांनी संघाचे एकतर गोडवे गाईले किंवा जुन्याच मुद्द्यांनी संघावर टीकेची राळ उडविली, पण त्यापलीकडे जाऊन संघ स्वयंसेवक नरेंद्र मोदी नावाच्या राज्यकर्त्याने सरकार प्रमुख म्हणून 25 व्या वर्षांत पदार्पण केले, या महत्त्वाच्या मुद्द्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही स्वतः नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया अकाउंट वर आपल्या सरकार प्रमुख पदाने 25 व्या वर्षात आज पदार्पण केले असे लिहिल्यानंतर प्रसार माध्यमांना “जाग” आली आणि त्या सोशल मीडिया पोस्टच्या आधारे अनेकांनी मोदींच्या राज्यकर्ता भूमिकेची पंचविशी साजरी केली.
– मोदी कायम सत्ताधारी बाकांवर, पण...
आपला DNA च विरोधकांचा आहे, अशी ज्या भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून नेत्यांपर्यंतची भावना आहे, त्या भाजपच्या सरकारांचे नेतृत्व नरेंद्र मोदींनी गेली 25 वर्षे केले. ते कधीही विरोधी बाकांवर बसले नाहीत. ते कायम सत्ताधारी बाकांवर बसले, इतकेच नाही तर ते कायम पहिल्या रांगेत पहिल्या खुर्चीवर बसले, तरी देखील भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंतचा आपला DNA विरोधकांचा असल्याचा न्यूनगंड अद्याप गेलेला नाही.
– धाडसी ऐतिहासिक कामगिरीचे धनी
पण त्याही पलीकडे जाऊन कोणीही प्रसार माध्यमांनी मोदींच्या राज्यकर्ता म्हणून नेतृत्वाचे मूल्यांकन केलेले आज तरी दिसले नाही. स्वतः मोदींनी सुद्धा राज्यकर्ता म्हणून फार मोठे आत्मचिंतन केल्याचे जाहीररित्या तरी लिहिले नाही. पण तरी देखील नरेंद्र मोदी नावाचे संघ स्वयंसेवक हे इतर पठडीबाज राज्यकर्त्यांपेक्षा वेगळे ठरले. त्यांनी अनेक ऐतिहासिक धाडसी निर्णय घेतले, हे सत्य मान्य करावे लागेल. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना नरेंद्र मोदींनी 25 वर्षे राज्य केले. ते सरकार प्रमुख म्हणून वावरले. पण त्यांच्यातले स्वयंसेवकत्व कधी दूर झाले नाही. विरोधकांनी त्यांच्यावर मौत का सौदागर किंवा चौकीदार चोर इथपर्यंतचे लांच्छन लावले. नरेंद्र मोदींनी सुद्धा तिखट प्रहार करून विरोधकांना नामोहरम केले. नामदार विरुद्ध कामदार अशा म्हणी वापरून घराणेशाही पक्षांना पराभूत केले, पण स्वतःतला सेवाभाव कधी दूर होऊ दिला नाही. राज्यकर्ता म्हणून ते बसलेली खुर्ची कधी स्वतःच्या डोक्यावर बसू दिली नाही. एरवी कुठल्याही राज्यकर्त्याला कठीण असलेली बाब नरेंद्र मोदींनी स्वयंसेवकत्वाच्या भूमिकेमुळे सहज साध्य करून घेतली.
On this day in 2001, I took oath as Gujarat’s Chief Minister for the first time. Thanks to the continuous blessings of my fellow Indians, I am entering my 25th year of serving as the head of a Government. My gratitude to the people of India. Through all these years, it has been… pic.twitter.com/21qoOAEC3E
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2025
– aura निर्माण केला, पण…
नरेंद्र मोदी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःचा
aura निर्माण करू शकले, हे खरे पण म्हणून ते अव्वल दर्जाचे राज्यकर्ते ठरले किंवा फार मोठे राजकीय मुत्सद्दी ठरले असे मान्य करणे मोदींच्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या टर्ममध्ये तरी कठीण आहे. कारण ते विरोधकांना खऱ्या अर्थाने वैचारिक दृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या नामोहरम शकले नाहीत. किंबहुना अद्दल घडवू शकले नाहीत. गांधी परिवार आणि घराणेशाहीतली काही नेते ही त्यांची उदाहरणे उघड दिसत आहेत. नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी दगा दिला, तो मोदींना वेळीच ओळखता आला नाही.
– तिसऱ्या टर्ममध्ये सर्वांत मोठी आव्हाने
सध्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात तर मोदींसमोरची आव्हाने सर्वांत मोठी आहेत. त्या आव्हानांना सामोरे जाण्यात मोदी कधी कचरले नाहीत हे खरे, पण म्हणून त्यांनी आव्हानांवर 100% मात केली, असेही म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. उलट मोदी सलग 25 वर्षे राज्यकर्ता बनून राहिले, तरी ते स्वतःचा आणि स्वतःच्या संघटनेचा विशिष्ट nationalists narrative संपूर्ण देशभरात रुजवू शकले नाहीत आणि विरोधकांच्या fake narrative वर पूर्णपणे मात करू शकले नाहीत, असे म्हणण्यासारखी मात्र परिस्थिती निश्चित आहे. अन्यथा मोदींच्या 25 वर्षांच्या राज्यकर्ता कारकिर्दीत विरोधकांचा अजेंडा वेगळ्या पद्धतीने मान्य करावा लागण्याची त्यांना गरज पडली नसती. उलट राज्यकर्ता म्हणून स्वतःचा आणि स्वतःच्या संघटनेचा विशिष्ट narrative ते प्रस्थापित करू शकले असते, तर विरोधकांची त्यांच्यामागे आणि त्यांच्या narrative मागे फरफट झालेली दिसली असती. पण आज तरी तसेच चित्र दिसत नाही. पण त्यामुळे नरेंद्र मोदींच्या राज्यकर्ता म्हणून मोठ्या achievements झाकता येणार नाहीत.
Narendra Modi enters 25 th year as head of the government
महत्वाच्या बातम्या
- Nepal : नेपाळमध्ये भूस्खलनामुळे दोन दिवसांत 51 जणांचा मृत्यू; 9 जण बेपत्ता; लष्कराच्या हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू
- Diwali : दिवाळी-छठदरम्यान विमान भाडे वाढवणाऱ्यांवर कडक कारवाई; 1700 अतिरिक्त उड्डाणे असतील
- सनातनचा अपमान; सरन्यायाधीश भूषण गवईंवर वयोवृद्ध वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न; शरद पवारांकडून पहिला निषेध
- US Government : अमेरिकेच्या अण्वस्त्रांवरही शटडाऊनचा परिणाम; ऊर्जा सचिव म्हणतात- सुरक्षा निधी 8 दिवसांपासून प्रलंबित
Post Your Comment