Trending News

No trending news found.

Saturday, 10 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

दोन्ही मुलांना व्यवस्थित settle करून नारायण राणे सन्मानाने निवृत्तीच्या दिशेने…, पण…

दोन्ही मुलांना व्यवस्थित settle करून नारायण राणे सन्मानाने निवृत्तीच्या दिशेने निघालेत..., पण महाराष्ट्रातल्या सगळ्यात ज्येष्ठ नेत्याला अजून काही निवृत्त होण्याचा विचार मनाला शिवत नाही. मनाला शिवला, तरी तो अंमलात आणता येत नाही.

दोन्ही मुलांना व्यवस्थित settle करून नारायण राणे सन्मानाने निवृत्तीच्या दिशेने निघालेत…, पण महाराष्ट्रातल्या सगळ्यात ज्येष्ठ नेत्याला अजून काही निवृत्त होण्याचा विचार मनाला शिवत नाही. मनाला शिवला, तरी तो अंमलात आणता येत नाही. कारण अजून मुलगी काही मनासारखी सेटल करता आलेली नाही. Narayan Rane

नारायण राणे यांनी कालच सिंधुदुर्ग मधल्या कार्यक्रमात आता घरी बसणार कारभारावर लक्ष ठेवणार आणि मुलांना सांगणार “सौख्यभरे नांदा” असे म्हणत स्वतःहून निवृत्तीचे संकेत दिले. त्यानंतरच चिपळूण मधल्या कार्यक्रमात त्यांना चक्कर आल्याने भाषण मध्येच थांबवून कार्यक्रमाच्या बाहेर पडावे लागले. त्यांनी चिपळूण मधल्या सरकारी विश्रामगृहात विश्रांती घेतली. नारायण राणे यांच्या अनेक समर्थकांनी त्यांची व्यवस्थित काळजी घेतली.

– निवृत्तीची चर्चा पुन्हा ऐरणीवर

पण नारायण राणे यांनी काल स्वतःहून निवृत्तीचे संकेत दिल्याने महाराष्ट्रातल्या राजकीय निवृत्तीची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली. नारायण राणे यांनी आपल्या राजकीय आयुष्यात नगरसेवक पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंत आणि त्यापुढे जाऊन केंद्रीय मंत्री पदापर्यंत अनेक पदे भोगली. कोकणातून दिल्लीत जाऊन नाथ पै आणि मधु दंडवते यांच्यासारखे दिल्लीतले राजकारण सुद्धा गाजविले. पण नाथ पै आणि मधु दंडवते हे समाजवादी परंपरेतले नेते होते. त्या उलट नारायण राणे हे हिंदुत्ववादी परंपरेतले नेते राहिले. त्यांनी मध्यंतरी काँग्रेस मधून राजकारण केले असले, तरी त्यांच्या राजकारणाला आणि व्यक्तिमत्त्वाला काँग्रसी राजकारणाचे वळण कधीच लागू शकले नाही. कारण त्यांची जडणघडण शिवसेनाप्रमुखांनी केली होती. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये राहून सुद्धा शिवसेना स्टाईलचे आक्रमक राजकारण करत राहिले होते. ते राजकारण काँग्रेसी नेत्यांना पचले नाही आणि काँग्रेसी राजकारणाचे वळण नारायण राणे यांना रुचले नाही म्हणून नारायण राणे यांनी काँग्रेस पासून फारकत घेत भाजपचा रस्ता धरला. भाजपने सुद्धा त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध व्यवस्थित वापर करून घेतला. त्यांच्या दोन्ही मुलांना राजकीयदृष्ट्या settle केले आणि म्हणूनच नारायण राणे सन्मानाने निवृत्तीच्या दिशेने निघू शकले.

– शरद पवारांची (न)निवृत्ती

पण नारायण राणे यांच्या निवृत्तीच्या चर्चेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या दुसऱ्या ज्येष्ठ नेत्यांची निवृती पुन्हा चर्चेचा विषय ठरली. शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्राच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात निवृत्तीची घोषणा केली होती परंतु त्यांना ती अंमलात आणता आली नाही. पवारांच्या समर्थकांनी त्यांना निवृत्त होऊ दिले नाही. पण खरं म्हणजे पवारांनाच निवृत्त व्हायचे नव्हते. त्यांनी फक्त ती हूल दिली होती, असे त्यावेळी बोलले गेले आणि नंतरही त्यावर शिक्कामोर्तब होत राहिले. कारण निवृत्तीची घोषणा केल्यानंतर घडलेल्या राजकारणात शरद पवारांनी स्वतःलाच राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव चेहरा म्हणून जनतेच्या समोर ठेवले.



– मतभेद घरापुरते ठेवण्यात राणे यशस्वी…

राज्यात झालेल्या नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांमध्ये नारायण राणे यांनी सक्रिय सहभाग घेतला नाही. त्यांच्या ऐवजी नितेश राणे आणि निलेश राणे या दोन बंधूंनी वेगवेगळ्या पक्षांमधून त्यात सहभाग घेतला. या निवडणुकीत दोघांमध्ये मर्यादित मतभेद सुद्धा झाले, पण नारायण राणे ते मतभेद घरापुरते ठेवण्यात यशस्वी ठरले किंबहुना निवडणुका संपल्यानंतर दोन्ही भाऊ एकत्र आल्याचे सुद्धा दिसले.

– पवारांनी जुळवून घेतले, कारण…

पण पवार मात्र तसेच घरात काही घडवू शकले नाहीत. पवारांनी अजित पवारांची तात्पुरते जुळवून घेतले, पण ते गौतम अदानींच्या कार्यक्रमापुरते. आताही शरद पवार अजित पवारांशी जुळवून घेतील, ते स्वतःची राज्यसभा सीट सुरक्षित करण्यासाठीच, याचीच चर्चा सगळीकडे महाराष्ट्रात रंगली आहे. शरद पवारांच्या राज्यसभेची मुदत मार्च 2026 मध्ये संपत आहे. राज्यसभेवर पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांच्याकडे संख्याबळ नाही. त्यामुळे शरद पवारांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला बसलेल्या अजित पवारांशी जुळवून घेण्याखेरीज पर्याय नाही, असे बाकी कुणापेक्षा त्यांचे समर्थकच जास्त बोलताहेत. पवारांच्या वयाच्या 85 व्या वर्षीची ही राजकीय अवस्था आहे.

नारायण राणे वयाच्या 73 व्या वर्षी सन्मानाने निवृत्ती कडे निघालेत, कारण दोन्ही मुलांना ते यशस्वीपणे settle करू शकले, पण 85 वर्षांचे शरद पवार अजूनही निवृत्त होऊ शकत नाहीत, कारण त्यांची मुलगी अजून मनासारखी settle होऊ शकलेली नाही.

– लोकांनी सांगण्यापूर्वी…

“तुम्ही, आता थांबा” असे लोकांनी सांगण्यापूर्वी कामातून निवृत्त व्हावे. त्यामुळे तुमचा सन्मान टाकतो, असे अनेक विद्वान लोक सांगतात. नारायण राणे यांना कोणी निवृत्त व्हायला सांगितले नाही, तरीसुद्धा ते निवृत्तीच्या दिशेने निघालेत म्हणून त्यांचा सन्मान टिकतोय… बाकीच्यांचे काय होतेय, हे वेगळे लिहिण्याची गरज नाही!!

Narayan Rane is retiring honorablely, but…..

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment