Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Manoj Jarange : मनोज जरांगेंचा हल्लाबोल- अजित पवारांनी साप पोसलेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मराठा समाजाविरोधात काम करत असल्याचा आरोप

ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आज थेट आणि गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. ओबीसी समाजाला लहान भाऊ मानणाऱ्या मराठ्यांविरोधात भुजबळ यांनी विनाकारण एक 'टोळी' निर्माण केली असून, या टोळीच्या माध्यमातून मराठा समाजावर शत्रुत्वाची भूमिका पार पाडत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. तसेच अजित पवारांच्या पक्षाचे जास्त नेते मराठा समाजाच्या विरोधात काम करतात, असा आरोप त्यांनी केला. तुम्ही साप पोसले आहे, एक दिवस तुम्हाला आमचा शब्द खरा वाटेल, असा इशाराही मनोज जरांगेंनी अजित पवारांना दिला.

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Manoj Jarange  ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आज थेट आणि गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. ओबीसी समाजाला लहान भाऊ मानणाऱ्या मराठ्यांविरोधात भुजबळ यांनी विनाकारण एक ‘टोळी’ निर्माण केली असून, या टोळीच्या माध्यमातून मराठा समाजावर शत्रुत्वाची भूमिका पार पाडत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. तसेच अजित पवारांच्या पक्षाचे जास्त नेते मराठा समाजाच्या विरोधात काम करतात, असा आरोप त्यांनी केला. तुम्ही साप पोसले आहे, एक दिवस तुम्हाला आमचा शब्द खरा वाटेल, असा इशाराही मनोज जरांगेंनी अजित पवारांना दिला.Manoj Jarange

मनोज जरांगे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी ओबीसी नेत्यांवर जोरदार टीका करत मराठा समाजाला सावध राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले आम्ही ओबीसींना आमचे लहान भाऊ, मोठे भाऊ समजायचो. परंतु, यांनी विनाकारण मराठ्यांच्या विरोधात एक टोळी निर्माण केली आणि त्या टोळीच्या माध्यमातून मराठा समाजावर शत्रुताची भूमिका पार पाडायला लागलेत. मराठ्यांचे वेळेवर डोळे उघडले. त्यामुळे मराठ्यांनी सावध होणे गरजेचे आहे. मराठ्यांना आता जीआरसाठी लढावे लागणार आहे.Manoj Jarange



मराठ्यांना शेतीसोबत नोकरी आवश्यक

महाराष्ट्रातील मराठा समाज शेती व्यवसाय करणारा आहे. आपल्याला नोकरी आधार पाहिजे. आपल्याला शिक्षण आणि नोकरी मिळू नये, अशी त्यांची भूमिका आहे. तर मराठ्यांना उच्च शिक्षण, नोकरी मिळाली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. शेतीवर अशी संकटे येतात की, शेतकरी उद्ध्वस्त होतो. बाकीच्यांना शेती आणि नोकरी असल्यामुळे डबल आधार आहे. आपल्या शेतकऱ्याला आधार नाही, हे मराठ्यांनी समजून घ्यावे. त्यामुळे मराठ्यांच्या आरक्षणाला धक्का लागू द्यायचा नाही, पण राहिलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी ताकदीने उभे राहायचे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. विरोधकांनी कितीही डाव टाकले, तरी त्यांना हरवायचे. 2029 च्या निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेल्या नेत्यांना आठवणीने पाडायचे, हे मराठ्यांनी लक्षात ठेवावे, असेही मनोज जरांगे म्हणाले.

पोलिस तपास दबावापोटी असू शकतो

लातूर जिल्ह्यात आरक्षणासाठी झालेल्या आत्महत्या प्रकरणांत चिठ्ठ्या ‘प्लांट’ केल्याचे तपासात समोर आल्याच्या माहितीवर जरांगे यांनी शंका व्यक्त केली. “यावर प्रतिक्रिया घ्यायला नाही पाहिजे. कोणाच्या भावनांशी, दु:खाशी आपण खेळू शकत नाही. मी याचे समर्थन करत नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी पुढे म्हटले, “छगन भुजबळांसारखे काही ओबीसी नेते सध्या खालच्या थराला गेले आहेत. अधिकाऱ्यांवर दडपण आणून असले प्रकार केले जातात. पोलिसांचा तपास दबावापोटी असू शकतो,” अशी शंका त्यांनी व्यक्त केली. मराठ्यांचे अधिकारी निलंबित करायचे आहेत, आत्महत्या असल्या तरी खोट्या दाखवायच्या, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

अजित पवारांच्या पक्षावर गंभीर आरोप

मराठ्यांचा जेवढा अपमान करता येईल, तेवढा प्रयत्न छगन भुजबळ करत आहेत. अजित पवारांच्या पक्षाचे जास्त नेते मराठा समाजाच्या विरोधात काम करतात. सगळीकडून उठतात आणि बीडमध्ये मोर्चा काढतात. सगळे नेते त्यांचे असणार, सर्व पदाधिकारी त्यांचे असणार. तुम्ही साप पोसले आहे, एक दिवस तुम्हाला आमचा शब्द खरा वाटेल, असेही मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांना इशारा देत म्हटले आहे.

Manoj Jarange Slams Ajit Pawar: ‘You Nurtured Snakes, Will Regret It’; Accuses NCP Leaders of Hating Marathas

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment