Trending News

No trending news found.

Monday, 12 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक

मोदींच्या भाजपने आज पुन्हा नवा धक्का दिला ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड पुन्हा मोडला. बिहार मधले मंत्री नितीन नवीन सिन्हा यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या समस्त मोदी समर्थक आणि मोदी विरोधक पत्रकारांचा पुरता पचका केला.

मोदींच्या भाजपने आज पुन्हा नवा धक्का दिला ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड पुन्हा मोडला. बिहार मधले मंत्री नितीन नवीन सिन्हा यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या समस्त मोदी समर्थक आणि मोदी विरोधक पत्रकारांचा पुरता पचका केला. कारण या सगळ्यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी जेवढी म्हणून नावे समोर आणली होती, त्यापैकी एकाही व्यक्तीची निवड मोदींच्या नेतृत्वाखालच्या भाजपने केली नाही. त्या उलट ज्यांचे नाव कुठल्याच माध्यमांनी केव्हाही चर्चेत आणलेच नाही किंबहुना बहुतांश माध्यमांना ज्यांचे नाव फारसे माहीतच नव्हते, अशा नितीन नबीन सिन्हा यांचे नाव मोदींच्या नेतृत्वाखालच्या भाजपने अचानक पुढे आणले आणि त्यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदावर नियुक्त सुद्धा करून टाकले.

नितीन नवीन सिन्हा या नावाची साधी भनक सुद्धा देश पातळीवरच्या कुठल्याच राष्ट्रीय अथवा प्रादेशिक माध्यमांना किंवा त्यांच्यातल्या दुढ्ढाचार्य पत्रकारांना लागू शकली नाही.

आम्हीच फक्त ब्रेकिंग न्यूज देतो आम्हीच फक्त खरी शोध पत्रकारिता करतो असा दावा करणाऱ्या सगळ्या दुढ्ढाचार्य पत्रकारांचा पापड मोदींच्या भाजपने पुन्हा एकदा मोडला. कारण आत्तापर्यंत मोदींनी अनेक नावांच्या बाबतीत आणि पदांच्या बाबतीत असाच माध्यमांचा पापड मोडला होता.

– मोदींचे नेहमीचे धक्का तंत्र

2014 नंतर राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदांच्या निवडणुकांच्या वेळी माध्यमांनी अनेक नावे पुढे आणली होती पण त्यापैकी एकही नावाची निवडणूक करता सुरुवातीला मोदींनी रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे आणले त्यांच्या पाठोपाठ द्रौपदी मुर्मू यांचे नाव पुढे आणून या दोन्ही नेत्यांना राष्ट्रपती केले. दोन्ही वेळच्या राष्ट्रपती पदांच्या निवडणुकीत एकाही माध्यमाला या नावांची भनक लागली नव्हती. त्यांनी भलतीच नावे अनेकदा समोर आणली होती. त्यातही मराठी माध्यमांनी नेहमीप्रमाणे शरद पवारांचे नाव पुढे रेटून त्याच्या वेगवेगळ्या स्टोरीज चालविल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात मोदींनी जोरदार धक्का तंत्र देऊन रामनाथ कोविंद आणि द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदावर नियुक्त केले.

– वेगवेगळ्या नावांचे पतंग

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या बाबतीतही माध्यमांनी भरपूर पतंग उडवून घेतले. माध्यमांनी मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, अण्णामलाई, केशव प्रसाद मौर्य आदींची नावे चर्चेत ठेवली त्या नावान भोवती वेगवेगळ्या राजकीय पिंगा घातला. पण मोदींच्या नेतृत्वाखालच्या भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाने यापैकी एकाही नावाची निवड भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी न करता अचानक भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदावर नितीन नवीन सिन्हा यांच्यासारख्या बिहार मधल्या प्रादेशिक तरुण नेत्याची निवड केली.

– संघटनात्मक कौशल्यासाठी ओळख

नितीन नवीन सिन्हा हे त्यांच्या संघटनात्मक कौशल्यासाठी ओळखले जात असले तरी त्यांचे नाव उत्तरेतल्या राज्यांपुरते आत्तापर्यंत तरी मर्यादित राहिले होते. ते छत्तीसगडचे भाजप प्रभारी होते. छत्तीसगड मधले भूपेश बघेल यांचे सरकार घालविण्याचे कौशल्य त्यांनी दाखविले होते. त्याआधी अनुराग ठाकूर हे भाजपच्या राष्ट्रीय युवा मोर्चाचे अध्यक्ष असताना नितीन नवीन सिन्हा हे भाजपचे राष्ट्रीय महामंत्री होते. त्याचवेळी ते बिहार मधून आमदार होते. बिहारच्या मंत्रिमंडळात ते गेल्या टर्म मध्ये मंत्री झाले. 2025 नंतर सुद्धा भाजपने त्यांना बिहारमध्येच मंत्री केले.



– मोदींनी आधीच हेरून ठेवलेले नाव

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या नावांच्या वर्तुळात त्यांचे नावही कुणी घेतले नव्हते. भाजपच्या अंतर्गत वर्तुळात सुद्धा त्यांच्या नावाची फारशी चर्चा कुणी पुढे आणली नव्हती. पण मोदींनी नेहमीप्रमाणे नितीन नवीन सिन्हा यांना हेरून ठेवले होते. त्यांचे नाव सार्वजनिक पातळीवर पुढे येऊ दिले नव्हते. सार्वजनिक पातळीवर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या नावांची भरपूर चर्चा घडून गेल्यानंतर मोदींनी राजकीय पटावरचे प्यादे आपल्या पद्धतीने पुढे सरकविले. नितीन नवीन सिन्हा यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती केली. याआधी जेपी नड्डा यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती होण्यापूर्वी त्यांची सुद्धा अशीच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती झाली होती त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्येच नितीन नवीन सिन्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील, अशा अटकळी आता बांधल्या जाऊ लागल्या आहेत.

– मोठ्या बदलाची चुणूक

नितीन नवीन सिन्हा हे आत्तापर्यंत बिहारच्या प्रादेशिक पातळीवरच्या राजकारणात सक्रिय होते यापुढे राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात पक्षाच्या सर्वोच्च पदावरून सक्रिय होण्यासाठी त्यांना एक विशिष्ट वेळ लागेल आणि तो दिला जाईल. त्यानंतर भाजपमध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर वरपासून खालपर्यंत मोठे बदल होतील, त्याचेच संकेत 45 वर्षांच्या नितीन नवीन सिन्हा यांच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्तीतून मोदींच्या नेतृत्वाखालच्या भाजपने दिलेत.

पण या बदलाचे संकेत देताना मोदींनी किंवा भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी कुठलीच मोठ्या राजकीय भूकंपाची फालतू भाषा वापरली नाही. त्यांनी त्यांना हवे तसे, हवे त्यावेळी करून घेतले. त्याची साधी भनक सुद्धा कुणाला लागू दिली नाही.

Major changes in BJP offing after appointment of Nitin Nabin as BJP working president.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment