Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

महायुतीतले स्वबळ; इतर पक्षांना “खाली” कर!!

महायुतीतले स्वबळ इतर पक्षांना "खाली" कर!!, असलाच राजकीय प्रकार महाराष्ट्रात समोर येऊन राहिलाय.

नाशिक : महायुतीतले स्वबळ इतर पक्षांना “खाली” कर!!, असलाच राजकीय प्रकार महाराष्ट्रात समोर येऊन राहिलाय. महायुती मधले भाजप, शिंदे सेना आणि अजित राष्ट्रवादी एवढे प्रबळ बनलेत की ते आपापल्या पक्षाच्या विस्तारासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवायच्या बेतात आहेत. त्यासाठी आपापल्या बालेकिल्ल्यांमध्ये म्हणजेच मुंबई ठाणे, पुणे या जिल्ह्यांमध्ये ते एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवायच्या तयारीत आहेत‌. इतर ठिकाणी सुद्धा मैत्रीपूर्ण लढतीच्या गोंडस नावाखाली महाविकास आघाडीला जेरीस आणायचे बेत आखले जात आहेत, म्हणून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी सुरू आहे.

सक्षम उमेदवार खेचायची तयारी

मुंबई, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांमधल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती यांच्यावर वर्चस्व मिळविण्यासाठी तिन्ही पक्ष एकवटून लढविण्याऐवजी वेगवेगळे लढून आपली ताकद घटविण्याची शक्यता वाटत असतानाच प्रत्यक्षात राजकीय गणितानुसार नव्हे तर “पॉलिटिकल केमिस्ट्री” नुसार हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीचे घटक पक्ष फोडून त्यांचे निवडणूकक्षम बळकट उमेदवार आपापल्या पक्षात खेचून घेण्याच्या तयारीला लागलेत. महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या फुटीच्या आधारावर तर महायुतीतल्या घटक पक्षांचे स्वबळ वाढणार आहे. जितके जास्त बळकट उमेदवार महायुतीतले घटक पक्ष महाविकास आघाडीतून फोडून आपल्याकडे घेतील, तितके या तिघांचे स्वबळ वाढणार आहे, म्हणूनच तर महायुती म्हणून मर्यादित “पॉलिटिकल स्पेस” मध्ये निवडणूक लढविण्यापेक्षा स्वबळावर निवडणूक लढण्याची चाल सुरुवातीला भाजपने खेळली नंतर तिचाच अवलंब एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केला.



– निवडणूक आयोगापुढे रिकामी डोकेफोड

देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आपापल्या पक्षांच्या विस्तारासाठी मेळावे घेण्यात मग्न झालेत. ज्यावेळी महाविकास आघाडीचे पक्ष नेते निवडणूक आयोगाकडे जाऊन रिकामी राजकीय डोकेफोड करतायेत, त्यावेळी महायुतीतले तिन्ही नेते निवडणूक आयोग किंवा महाविकास आघाडीच्या नादी न लागता आपापल्या पक्षांच्या मेळाव्यांमध्ये मग्न झालेत. महाविकास आघाडीतले घटक पक्ष टप्प्याटप्प्यांवर आणि वेगवेगळ्या ठिकाणी फोडून स्वतःच्या पक्षाच्या बळकटीकरणाच्या मागे लागलेत. शिवाय महायुतीतल्या घटक पक्षांनी निवडणूक जरी स्वबळावर लढविली, तरी निवडणुकीनंतर सत्ता हस्तगत करण्यासाठी गरज पडल्यास, आम्ही तर महायुती म्हणून राज्य सरकार चालवतो, असे म्हणून महायुती मधले घटक पक्ष महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी पुढे आल्याशिवाय राहणार नाहीत. या सगळ्यात महाविकास आघाडीच्या हाती आदळ आपट करण्याशिवाय काही राहणार नाही.

Mahayuti leaders engaged in breaking MVA parties again

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment