Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Mahayuti’s Resolve : अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणार; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीचा निर्धार

महाराष्ट्रात सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वी आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Mahayuti’s Resolve महाराष्ट्रात सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वी आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.Mahayuti’s Resolve

पत्रकार परिषदेत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, उद्यापासून महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात विविध विषयांवर चर्चा व्हावी हे अपेक्षित असते. आता हे दुसरे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की अजितदादा यांनी राज्याचा 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. 2011 साली पहिल्यांदा सादर केलेला अर्थसंकल्प हा 1 लाख 44 हजार 783 कोटी रुपयांचा होता. तर 2025 मध्ये त्यांच्या कारकीर्दीतील शेवटचे अर्थसंकल्प हे सर्वाधिक 7 लाख 20 हजार कोटी रुपयांचे होते. ही केवळ आकड्यांमध्ये झालेली वाढ नाही तर राज्याच्या सर्वांगीण विकासात झालेली वाढ आहे.Mahayuti’s Resolve



दादांनी अर्थसंकल्पाची जोरदार तयारी केली होती, पण..

पुढे बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, अजितदादांनी आर्थिक तडजोड कधीही केली नाही. विकास आणि शिस्त याचा समतोल राखत त्यांनी काम केले. फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाच्याखाली आणि एकनाथ शिंदे यांच्या साथीने आदरणीय दादांनी अर्थसंकल्पाची जोरदार तयारी केली होती. यावर्षीचा हा त्यांचा 12 वा अर्थसंकल्प ठरला असता, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि आपल्याला ते सोडून गेले.

लाडकी बहीण योजना यशस्वी सुरू ठेवली

लाडकी बहीण योजना बंद होईल अशी टीका विरोधकांनी केली. मात्र, अजितदादांनी योग्य आर्थिक नियोजन करून या योजनेसाठी निधीची कमतरता कधीही भासू दिली नाही. ही योजना यशस्वीपणे सुरू ठेवली. हे माझे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अतिशय नियोजनपद्धतीने आणि चांगल्या प्रकारे पार पडेल अशी मला खात्री आहे, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

दादांना श्रद्धांजली वाहून अधिवेशनची सुरुवात करण्याची दुर्दैवी वेळ- एकनाथ शिंदे

यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बजेट सेशन म्हटले की सगळ्यांचे लक्ष अजितदादांकडे लागून राहायचे. आता सुनेत्रा ताईंनी सांगितले की त्यांनी 11 बजेट सादर केले. पण आज अजितदादा आपल्यात नाहीत. दादांना श्रद्धांजली वाहून अधिवेशनची सुरुवात करण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर आली आहे. शेवटी आपल्या हातात काही गोष्टी नसतात आणि नियतीसमोर आपले काही चालत नाही, हे या दुर्घटनेवरून सिद्ध झाले आहे. सुनेत्रा ताई आहेत आम्ही दोघेही त्यांच्या पाठीशी आहोत.

गेल्यावर्षी बजेट मांडताना अजितदादा म्हणाले होते, विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. शिस्तप्रिय आणि आर्थिक घडी कशी बसवायची आणि प्रसंगी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना आपल्या राज्याच्या आर्थिक बाबींबद्दल स्पष्टपणे सांगणारे अजितदादा गेले 25-30 वर्ष सोबत काम करताना आपण पाहिले आहे. आता त्यांचे जे काही स्वप्न आहे ते आपण पूर्ण करणार आहोत, महाराष्ट्राला पुढे नेणार आहोत. आता यावेळेसचे बजेट मुख्यमंत्री देवेंद्रजी मांडणार आहेत. ते देखील उत्तम अर्थतज्ञ आहेत. राज्याची आर्थिक नाडी त्यांना माहित आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही अनेक योजना केल्या. नुकतेच दावोसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी 30 लाख कोटींचे करार केले. 40-50 लाख लोकांना रोजगार मिळेल आणि राज्य प्रगतिपथावर नेण्याचे काम होत आहे. खऱ्या अर्थाने आताच ताईंनी लाडक्या बहीणींच्या बाबतीत विषय मांडला. मला आठवत आहे की मी मुख्यमंत्री असताना, आम्ही तिघांनी ठरवले होते की ही योजना करायची आहे. खर्च जास्त होणार होता आणि शेवटी धाडस केले आणि आम्ही ते केले आणि अजितदादांनी देखील जो भार होता तो सांभाळला आणि लाडकी बहीण योजना आज सुरू आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. लाडक्या बहीणींनी महायुती सरकारला आशीर्वाद दिले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या पत्रकार परिषदेवर टीका करताना म्हटले की, आज पत्रकार परिषदेत काही लोक सांगत होते की 3 हजार द्या, याच लोकांनी या योजनेत खोडा घातला होता. त्यातलेच काही लोक कोर्टात गेले होते. त्यांना वाटले होते की आम्ही फक्त निवडणुकीची घोषणा करत आहोत. आम्ही जे बोलतो ते करून दाखवणारे आहोत. आम्ही ज्या काही घोषणा केल्या आहेत आणि त्या योग्य वेळी पूर्ण करणार हा विश्वास मी तुम्हाला देतो. आता चहापानवर त्यांनी बहिष्कार टाकला आहे. हे अधिवेशन फक्त सरकारचे नाही.

मी आपल्याला एवढेच सांगतो की जे काही पूर्वीचे सरकार होते, त्यांनी जे काही काम केले ते जनतेच्यासमोर आहेत. त्यामुळे कोणाचे काळे धंदे होते हे त्यांनाही माहित आहेत. ते सभागृहात जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही नक्कीच उत्तर देऊ. दिल्लीच्या एआय समिटमध्ये जगभरातले लोक आले होते. त्यावेळी चड्डी बनयान गॅंग तिकडे आली आणि जे काही करायचे ते त्यांनी केले. त्यांनी स्वतःची अब्रू वेशीवर टांगली आहेच, पण सोबत देशाची देखील बदनामी करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी तर परदेशात जाऊन सुद्धा देशाची बदनामी करतात. अशा प्रकारची कृती या अधिवेशनात होऊ नये, असे आम्हाला वाटते. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यांनी जनतेचे प्रश्न उपस्थित करावे, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

Mahayuti’s Resolve: We Will Fulfill Ajit Dada’s Dream; Budget Session Begins

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment