Trending News

No trending news found.

Thursday, 18 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

TET : टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी गुरुजींना 6 संधी, 2 वर्षांत व्हावे लागणार पात्र; राज्य परीक्षा परिषदेचा दिलासादायक निर्णय

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केल्यानंतर आता शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या चार संधींमध्ये वाढ करून त्या सहा करण्याच्या हालचाली शासनाकडून सुरू झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दोन वर्षांच्या मुदतीत जास्तीत जास्त शिक्षकांना पात्र होता यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आता वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचे नियोजन करत आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : TET  शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केल्यानंतर आता शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या चार संधींमध्ये वाढ करून त्या सहा करण्याच्या हालचाली शासनाकडून सुरू झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दोन वर्षांच्या मुदतीत जास्तीत जास्त शिक्षकांना पात्र होता यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आता वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचे नियोजन करत आहे.TET

१ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने टीईटी सक्तीचा निर्णय दिला होता. या निर्णयानुसार ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत ही पात्रता सिद्ध करणे आवश्यक आहे. ही मुदत संपण्यापूर्वी शिक्षकांना जास्तीत जास्त संधी मिळाव्यात, यासाठी नोव्हेंबरनंतर आता जून २०२६ मध्ये पुन्हा परीक्षा घेण्याचा प्रयत्न परीक्षा परिषदेचा असणार आहे. ३१ ऑगस्ट २०२७ पूर्वी तीन सीटीईटी देखील होणार असल्याने शिक्षकांना केंद्र आणि राज्य अशा दोन्ही परीक्षांचे पर्याय उपलब्ध राहतील.TET



छत्रपती संभाजीनगरमधील ६ हजार शिक्षक रडारवर

पहिली ते आठवीच्या वर्गावर नियुक्त असलेल्या ५३ वर्षांपर्यंतच्या सर्व शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे सहा हजार शिक्षक अद्याप अपात्र असून, त्यांना या दोन वर्षांत आपली पात्रता सिद्ध करावी लागणार आहे. पदोन्नती आणि सेवेत कायम राहण्यासाठी ही शेवटची संधी मानली जात आहे.

Relief for Teachers: Maharashtra Increases TET Attempts to 6 by 2027

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment