Trending News

No trending news found.

Tuesday, 10 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Maharashtra Onion : महाराष्ट्रातील 1 लाख टन कांद्याची आता मॉरिशसलाही निर्यात; 5 लाख क्विंटल मका खरेदी करण्यासही केंद्र सरकारची मंजुरी

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नाशिक आणि नगरच्या कांद्याला आता मॉरिशसची बाजारपेठ उपलब्ध झाली असून, सुमारे १ लाख टनांहून अधिक कांदा निर्यात होणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत दिली.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Maharashtra Onion राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नाशिक आणि नगरच्या कांद्याला आता मॉरिशसची बाजारपेठ उपलब्ध झाली असून, सुमारे १ लाख टनांहून अधिक कांदा निर्यात होणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत दिली.Maharashtra Onion

चांदवड येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाबाबत सचिन अहिर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. रावल म्हणाले, गेल्या काही वर्षांत श्रीलंका आणि बांगलादेश या पारंपरिक बाजारपेठांनी स्वतः कांदा उत्पादन सुरू केले. स्पर्धा वाढली. म्हणून केंद्रास विनंती केली. ५ लाख क्विंटल मका खरेदीला मंजुरी दिली. मक्यासाठी २४०० रुपये प्रतिक्विंटल इतकी एसआरपी देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.Maharashtra Onion



कांद्याच्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ८० टक्के

भारताच्या एकूण कांदा निर्यातीपैकी सुमारे ८०% कांदा एकट्या महाराष्ट्रातून जातो. महाराष्ट्रातून होणाऱ्या एकूण निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक (जवळपास ७०-८०%) आहे. लासलगाव ही आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ निर्यातीचे मुख्य केंद्र आहे.

श्रीलंका-बांगलादेशातील वाढत्या स्पर्धेमुळे मॉरिशससारख्या नवीन बाजारपेठा शोधणे अनिवार्य झाले आहे. तसेच मे-जूनऐवजी मार्च-एप्रिलमध्ये सरकारी खरेदी करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी गेमचेंजर ठरू शकतो.

1 Lakh Tonne Maharashtra Onion to be Exported to Mauritius VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment