– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ब्रिटिश सीईओ शिष्टमंडळासोबत चर्चा
विशेष प्रतिनिधी
मुंबई ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी दौऱ्याची सुरुवात राजधानी नवी दिल्ली ऐवजी मुंबईतून केली. त्यांच्या समवेत उद्योगपती व्यापारी आणि कुलगुरूंचे एक मोठे शिष्टमंडळ आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या ताज महाल पॅलेस येथे ब्रिटिश सीईओ शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यांच्याशी उद्योग आणि व्यापार विषयक चर्चा केली.Maharashtra benefits from British Prime Minister’s visit; State moves towards new horizons of investment, technology and development!!
यावेळी मुख्यमंत्री यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असून दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ धोरणामुळे उद्योग परवानग्या सुलभ झाल्या असून गुंतवणूकदारांच्या समस्यांचे त्वरित निराकरण केले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वाधिक फायदेशीर राज्य ठरले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात दळणवळण, पायाभूत सुविधा, शिक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. नवी मुंबई येथे ‘एज्यु सिटी’, पालघर येथे वाढवण बंदर तसेच मुंबई जवळ ‘तिसरी मुंबई’ विकसित केली जात आहे. बुलेट ट्रेन स्थानक आणि ग्रीन इंडस्ट्रियल झोनच्या माध्यमातून पालघरचा परिसर ‘चौथी मुंबई’ म्हणून विकसित होत आहे.
मुंबई हे फिनटेक आणि फायनान्स कंपन्यांचे माहेरघर आहे तर छत्रपती संभाजीनगर हे ईव्ही हब बनत आहे, नागपूर सोलर मॉड्युल उत्पादन केंद्र बनत आहे आणि पुणे हे उद्योगांचे प्रमुख केंद्र आहे. महाराष्ट्र देशातील स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीत आघाडीवर आहे. पायाभूत सुविधांच्या विकासामुळे भारत आज गुंतवणूक स्नेही देश बनला तर महाराष्ट्र हे देशातील स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीत आघाडीवर आहे.
Historic interaction with the Top UK CEOs !
Absolutely thrilled to have a very memorable interaction with United Kingdom’s finest business minds led by UK Secretary of State for Business and Trade Mr Peter Kyle and Secretary of State for Scotland Mr Douglas Alexander.
This rare… pic.twitter.com/hWsuca0XUV— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 8, 2025
पारदर्शक प्रशासन आणि डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या प्रमाणाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “आज जगातील सर्वाधिक डिजिटल व्यवहार भारतात होत आहेत. हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल व्हिजनचे फळ आहे.” राज्याने 2030 पर्यंत 50% पुनर्वापर ऊर्जा वापराचे उद्दिष्ट ठेवले आहे. सौर ऊर्जेला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी ब्रिटिश सीईओ शिष्टमंडळाने राज्यातील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत एआय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीची इच्छा दर्शवली.
Maharashtra benefits from British Prime Minister’s visit; State moves towards new horizons of investment, technology and development!!
बातम्या
- अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा: तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर
- Cuttack : ओडिशाच्या कटकमध्ये हिंसाचारामुळे मोठा तणाव; प्रतिबंधात्मक आदेश लागू, विहिंप रॅलीत हिंस, 25 जखमी
- Iran : इराण चलनातून 0000 काढून टाकणार, 10000 आता 1 रियाल; महागाईमुळे उचलले पाऊलतुकडे
- तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा, मुंबईत झोपडपट्टी समूह पुनर्विकास; फडणवीस सरकारचे निर्णय
Post Your Comment