Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

भारताचा “नेपाळ” करायचा लिबरल लोकांनी डाव आखला; पण नाही करू शकले मोदी सरकारचा केस देखील वाकडा!!

भारताचा "नेपाळ" करायचा लिबरल लोकांनी डाव आखला; पण नाही करू शकले मोदी सरकारचा केस देखील वाकडा!!, अशीच अवस्था नेपाळ आणि भारतातल्या दोन दिवसांमध्ये घडामोडींनी दिसली.

नाशिक : भारताचा “नेपाळ” करायचा लिबरल लोकांनी डाव आखला; पण नाही करू शकले मोदी सरकारचा केस देखील वाकडा!!, अशीच अवस्था नेपाळ आणि भारतातल्या दोन दिवसांमध्ये घडामोडींनी दिसली. Liberals in India

नेपाळमध्ये तरुणाईचा उद्रेक झाल्यानंतर काठमांडू मध्ये प्रचंड जाळपोळ झाली. तिथली माओवाद्यांची सत्ता उघडली. नेपाळच्या पंतप्रधानांना राजीनामा देऊन लष्कराच्या छावणीमध्ये आश्रय घ्यावा लागला. त्यांच्याबरोबर अनेक मंत्र्यांनाही लष्कराच्या छावण्यांमध्ये जाऊन राहावे लागले.

नेपाळ मधल्या तरुणाईच्या उद्रेक प्रामुख्याने तिथल्या भ्रष्टाचारी राजकारण्यांच्या विरोधात होता. परंतु त्या उद्रेकाला सोशल मीडियावरच्या बंदीचे लेबल लावण्यात आले. दोन दिवसांच्या प्रचंड उद्रेकानंतर नेपाळमध्ये तिथल्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन करायचा निर्णय झाला. त्यामध्ये नंतर काही बदल झाले, पण उद्रेक करून जाळपोळीवर उतरलेली तरुणाई नंतर नेपाळ मधले रस्ते आणि जाळपोळ झालेली ठिकाणे साफसफाई करायला पुढे आली. जे चित्र बांगलादेश आणि श्रीलंकेत दिसले नव्हते, ते चित्र नेपाळमध्ये दिसले.

फारुख अब्दुल्लांचा दावा

पण या दरम्यानच्या काळात नेपाळ मधल्या उद्रेकामुळे भारतातल्या लिबरल लोकांना प्रचंड आनंद झाला. नेपाळमध्ये ज्या पद्धतीने राज्यकर्त्यांच्या घरात घुसून तरुणाईने जाळपोळ केली. तिथे अराजक माजविले तसेच अराजक भारतात घडवावे असे स्वप्न 2015 पासून इथले लिबरल लोक पाहतायत. ही स्वप्नपूर्ती लवकरच भारतात घडेल अशी आशा त्यांना नेपाळ मधल्या घडामोडींमुळे वाटली. त्यासाठी सोशल मीडियातून वेगवेगळे कॅम्पेन चालविले गेले. नेपाळ मधला उद्रेक हा बेरोजगार तरुणांचा होता. भारतातही प्रचंड बेरोजगारी आहे. नेपाळ मधल्या राज्यकर्त्यांना लष्करी छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला. भारतातही वेगळी स्थिती नाही, असा दावा जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी केला. त्यांच्या दाव्याला अनेक लिबरल लोकांनी पाठिंबा दिला. ज्यांनी शाहीन बागी आंदोलन चालविले, शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली फुटीरतावादी आंदोलनात घुसविले. ते सगळे लोक नेपाळमधील उद्रेकाच्या पाठीशी वैचारिक पातळीवर उभे राहिले. भारतामध्ये मोदी सरकार विरुद्ध असाच उद्रेक घडवायची नवी स्वप्ने पाहू लागले.



नेपाळमध्ये मोदींना पाठिंबा

पण इथेच लिबरल लोकांचे राजकीय गणित चुकले. कारण नेपाळमध्ये उद्रेक घडविणाऱ्या तरुणांनी नंतर तिथल्या साफसफाई मध्ये देखील पुढाकार घेतला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे नेपाळमध्ये के. पी. शर्मा ओली यांच्यासारखे माओवादी सत्तेवर नकोत तर नरेंद्र मोदी यांच्यासारखे हिंदुत्ववादी नेते सत्तेवर हवेत, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नेपाळ मधल्या तरुणाईने बराच खल करून इथल्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश सुशीला कार्की यांना हंगामी पंतप्रधान व्हायला राजी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी दाखविली. त्या योजनेतही नंतर काही बदल झाले. पण या सगळ्या प्रकारात नेपाळमध्ये माओवाद्यांची प्रचंड पिछेहाट झाली. कारण तिथल्या तरुणाईने नरेंद्र मोदींसारख्या नेतृत्वाची प्रशंसा केली. नेपाळी लष्कर प्रमुखांनी नेपाळचे संस्थापक राजे पृथ्वी नारायण शाह यांची तसबीर मागे लावून देशाला संबोधित केले. नेपाळची वाटचाल पुन्हा राजेशाही हिंदुराष्ट्राकडे सुरू झाल्याचे सूचित केले.

लिबरल लोकांचा पापड मोडला

त्यामुळे भारतातल्या लिबरल लोकांचा दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच पापड मोडला. नेपाळमधून उद्रेकाची प्रेरणा घेऊन भारतात उद्रेक घडवायचे मूसळ केरात गेले. कारण नेपाळची वाटचाल माओवादाकडून पुन्हा राजेशाही हिंदूराष्ट्राकडे सुरू झाली. नेपाळमध्ये ना अमेरिकन deep state यशस्वी झाले, ना चिनी माओवादी सत्ता टिकवू शकले. त्यामुळे नेपाळ मधल्या उद्रेकाच्या टेकूच्या आधारावर भारतामध्ये तसाच उद्रेक घडवायचे लिबरल लोकांचे स्वप्न भंगले. लिबरल लोक भारतातल्या मोदी सरकारच्या विरोधात फक्त बोटं मोडत राहिले. पण मोदी सरकारचा ते कुठला केस देखील वाकडा करू शकले नाहीत.

Liberals in India planned Nepal like violence in India, but they failed miserably

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment