Trending News

No trending news found.

Saturday, 10 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Jayant Patil : जयंत पाटलांनी सांगितले पडद्यामागील राजकारण; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरही केले भाष्य

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी पक्षातील हे दोन मित्रपक्षच एकमेकांवर जोरदार टीका करत असल्याने, निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडी आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्याचे चित्र पाहता ही निवडणूक विरोधकांविरुद्ध नसून सत्ताधाऱ्यांमध्येच अंतर्गत सुरू असल्याचे भासत आहे.

विशेष प्रतिनिधी

सांगली : Jayant Patil  राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी पक्षातील हे दोन मित्रपक्षच एकमेकांवर जोरदार टीका करत असल्याने, निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडी आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्याचे चित्र पाहता ही निवडणूक विरोधकांविरुद्ध नसून सत्ताधाऱ्यांमध्येच अंतर्गत सुरू असल्याचे भासत आहे.Jayant Patil

या वाढत्या राजकीय संघर्षावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी भाष्य करत पडद्यामागचे राजकारण उघड केले आहे. अजित पवार आणि भाजप नेत्यांमधील ही टीका-टीपण्णी म्हणजे केवळ दाखवण्यापुरती आहे की त्यामागे काही वेगळी रणनीती आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच, अजित पवारांकडून वारंवार ‘पवार कुटुंब’ पुन्हा एकत्र येण्याबाबत जी विधाने केली जात आहेत, त्यावरूनही पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.Jayant Patil



विरोधकांना टीकेचा स्पेसच मिळू नये असा प्रयत्न

सत्तेत असूनदेखील दोन पक्षातील नेते एकमेकांविरोधात टीका करतात, अगदी जोरात बोलत आहेत. भाजप नेते आणि अजित पवार यांच्यामध्ये होत असलेली वक्तव्य पाहता विरोधकांना स्पेसच मिळू नये, यासाठी हा प्रयत्न असावा, असे जयंत पाटील म्हणाले. परंतु, अजित पवार या षड्यंत्रयात सहभागी होणार नाहीत असे मला वाटते, असेही पाटील म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?

दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू असून, अजित पवार यांनीही आपल्या भाषणांतून तसे संकेत दिले आहेत. मात्र, या संदर्भात राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये अद्याप संभ्रम असल्याचे दिसून येते. यावर भाष्य करताना जयंत पाटील यांनी सावध भूमिका घेतली असून, राज्यस्तरावर अशा कोणत्याही हालचाली किंवा चर्चा सुरू असल्याची मला कल्पना नाही, असे म्हणत या विषयावर अधिक बोलणे टाळले.

विलासरावांच्या बाबतीत केलेले विधान लातूरकर कधीही मान्य करणार नाहीत

लातूरमधील प्रचारसभेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, असे विधान केल्यावर जयंत पाटील यांनी त्यावर कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. विलासरावांचे नाव विसरायला लावण्याचे धाडस जर भाजपचे नेते जाहीरपणे करत असतील, तर त्यांच्यात खासगीत कोणत्या दर्जाची चर्चा होत असेल याचा अंदाज येतो, अशी टीका पाटील यांनी केली. तसेच, लोकनेते विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेले असे वादग्रस्त वक्तव्य लातूरची जनता कधीही मान्य करणार नाही, असे ठाम मतही त्यांनी व्यक्त केले.

Jayant Patil Exposes ‘Behind the Scenes’ Politics of Mahayuti in Sangli Speech PHOTOS VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment