Trending News

No trending news found.

Saturday, 7 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
माहिती जगाची

Ayatollah Ali Khamenei : इराणी माध्यमांनी केले कन्फर्म- अमेरिका-इस्रायली हल्ल्यात सर्वोच्च नेते खामनेई ठार; खामेनेईंचे जावई-मुलगी, नात आणि सून यांचाही मृत्यू

इस्रायल आणि अमेरिकेने शनिवारी इराणमधील राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर हल्ला केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे.

वृत्तसंस्था

तेहरान : Ayatollah Ali Khamenei इस्रायल आणि अमेरिकेने शनिवारी इराणमधील राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर हल्ला केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे.Ayatollah Ali Khamenei

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करून सांगितले की, इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक खामेनेई मारला गेला. त्यांनी याला इराणच्या जनतेसाठी तसेच अमेरिका आणि जगभरातील देशांसाठी न्याय म्हटले.Ayatollah Ali Khamenei



यापूर्वी सीएनएनशी बोलताना इस्रायली अधिकाऱ्यांनी दावा केला की, त्यांच्याकडे खामेनेई यांच्या मृतदेहाचा फोटो आहे, जो ढिगाऱ्यातून काढण्यात आला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्त हल्ल्यात खामेनेई यांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे.

दुसरीकडे, इराणने खामेनेई यांच्या मृत्यूच्या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले. परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, सर्वोच्च नेते जिवंत आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

खामेनेई यांच्या जावई आणि सुनेच्या मृत्यूची बातमी

अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यांमध्ये खामेनेई यांच्या जावई आणि सुनेच्या मृत्यूची बातमी आहे. तेहरान सिटी कौन्सिलच्या एका सदस्याने दावा केला आहे की खामेनेई यांच्या जावई आणि सुनेचा मृत्यू झाला आहे. ही माहिती रॉयटर्सने यंग जर्नलिस्ट्स क्लबच्या हवाल्याने दिली आहे.

शनिवारी रात्री तेहरान आणि त्याच्या आसपासच्या अनेक ठिकाणी हल्ले झाले होते. इराणच्या सरकारी माध्यमांनी राजधानीत अनेक स्फोटांची पुष्टी केली होती. मात्र, खामेनेई यांच्या कुटुंबीयांच्या मृत्यूची अद्याप पुष्टी झालेली नाही. अमेरिका किंवा इस्त्रायलकडून यावर कोणतेही विधान आलेले नाही.

इराणवर अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 740 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ही माहिती इराणच्या रेड क्रिसेंट सोसायटीने दिली आहे.

इराणमधील एका शाळेवर क्षेपणास्त्र पडल्याने 85 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर 45 जखमी झाल्या आहेत. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात 10 मोठ्या शहरांना लक्ष्य केले.

इराणचा पलटवार – इस्रायलसह 9 देशांवर हल्ला

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इस्रायलसह मध्य-पूर्वेतील 9 देशांना लक्ष्य करण्यात आले.

इराणने इस्रायलवर सुमारे 400 क्षेपणास्त्रे डागली आणि कतार, कुवेत, जॉर्डन, बहरीन, सौदी अरेबिया व यूएईमधील अमेरिकन तळांनाही लक्ष्य केले. इतकंच नाही, तर इराणने यूएईमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दुबई शहरावरही हल्ला केला.

इराणने दुबईतील पाम हॉटेल अँड रिसॉर्ट आणि बुर्ज खलिफाजवळ ड्रोन हल्ला केला. याशिवाय बहरीनमधील अनेक निवासी इमारतींना लक्ष्य केले.

संयुक्त अमेरिका आणि इस्रायली लष्करी कारवाई

इस्रायलने इराणविरुद्धच्या आपल्या नवीन मोहिमेला “सिंहाची गर्जना” असे नाव दिले आहे. अल जझीराने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की ही अमेरिका आणि इस्रायलमधील संयुक्त लष्करी कारवाई आहे.

अणुशस्त्रांबाबत इराण आणि अमेरिकेत सुरू असलेल्या वाटाघाटी दरम्यान हा हल्ला झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यांनी सांगितले की या कारवाईचा उद्देश अमेरिका आणि तिच्या लोकांना धोक्यापासून वाचवणे आहे.

ट्रम्प यांच्या मते, अमेरिकन सैन्य इराणचे क्षेपणास्त्र नष्ट करण्याचा आणि त्यांचा क्षेपणास्त्र कार्यक्रम उध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे.

इराण-अमेरिकेदरम्यान बॅलिस्टिक क्षेपणास्त्रावरून वाद सुरू होता

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. अमेरिकेच्या सैन्याने इराणला आधीच चोहोबाजूंनी वेढले आहे. यापूर्वी शुक्रवारी अमेरिकेने आपल्या नागरिकांना तात्काळ इस्रायल सोडण्यास सांगितले होते.

इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या अणुकराराच्या चर्चेत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रकल्प हा सर्वात मोठा वादाचा मुद्दा बनला आहे. इराण यावर अजिबात तडजोड करण्यास तयार नाही आणि याला आपली ‘रेड लाईन’ मानतो.

इराणचे म्हणणे आहे की, त्याचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम संरक्षणासाठी आवश्यक आहे. इराणचे म्हणणे आहे की, जून 2025 मध्ये इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या अणु ठिकाणांवर हल्ला केला, तेव्हा इराणच्या क्षेपणास्त्रांनीच त्याचे संरक्षण केले.

इराणी अधिकाऱ्यांनी वारंवार सांगितले आहे की, क्षेपणास्त्र कार्यक्रमावर कोणतीही चर्चा होणार नाही. ही इराणची बचावात्मक क्षमता आहे आणि ती सोडणे म्हणजे स्वतःला कमकुवत करणे होय. इराण म्हणतो की, चर्चा केवळ अणुकार्यक्रमापुरती मर्यादित राहील, क्षेपणास्त्र किंवा प्रादेशिक गटांवर नाही.

Iran Supreme Leader Ayatollah Ali Khamenei Killed in US-Israel Attack VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment