Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

भारताचे क्रांति तीर्थ अंदमान बनले आता नैसर्गिक वायु उर्जा तीर्थ!!

भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अंदमानला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण तिथूनच सावरकरांच्या क्रांतीची ज्वाला संपूर्ण देशभर पसरली. तिच्यामुळे ब्रिटिश साम्राज्य संपुष्टात आले. अनेकानेक भारतीय क्रांतिकारकांनी तिथे कष्ट सोसले म्हणून भारताला स्वातंत्र्याची पहाट पाहता आली. अंदमान करोडो भारतीयांसाठी पूजनीय क्रांति तीर्थ बनले. पण आता भारताचे हे क्रांति तीर्थ अंदमान बनले आहे आता नैसर्गिक वायु उर्जा तीर्थ!!

नाशिक : भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अंदमानला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण तिथूनच सावरकरांच्या क्रांतीची ज्वाला संपूर्ण देशभर पसरली. तिच्यामुळे ब्रिटिश साम्राज्य संपुष्टात आले. अनेकानेक भारतीय क्रांतिकारकांनी तिथे कष्ट सोसले म्हणून भारताला स्वातंत्र्याची पहाट पाहता आली. अंदमान करोडो भारतीयांसाठी पूजनीय क्रांति तीर्थ बनले. पण आता भारताचे हे क्रांति तीर्थ अंदमान बनले आहे आता नैसर्गिक वायु उर्जा तीर्थ!!India’s Kranti Tirtha Andaman now becomes a Natural Wind Power Tirtha!!

आत्मनिर्भर भारताच्या नव्या संकल्पसह वाटचाल करणाऱ्या करोडो भारतीयांसाठी ही आनंदाची बातमी आली. अंदमानच्या समुद्रात खोलवर प्रचंड नैसर्गिक वायुसाठा आढळला आणि भारतीय वैज्ञानिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अंदमान निकोबार बेटांवर आणि समुद्रात उर्जेचे प्रचंड साठे आणि स्त्रोत आहेत, हे जगातील वैज्ञानिकांना माहिती आहे. पण या साठ्यांपैकी मोठ्या नैसर्गिक वायु साठ्याचा शोध भारतीय वैज्ञानिकांना लागला.



 

श्री विजयपूरम येथे नैसर्गिक वायु साठ्याचा शोध

अंदमान बेटापासून श्री विजयपूरम 2 येथे 9.20 नॉटिकल मैलांवर म्हणजेच साधारण 17 किलोमीटर अंतरावर समुद्रात 295 मीटर ते 2650 मीटर खोलवर प्रचंड वायुसाठा आढळला आहे. वैज्ञानिकांनी त्या परिसरात चाचण्या घेतल्या. त्यात त्यांना 2212 ते 2250 मीटर खोलवर मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल एवढा वायु साठा आढळला. तिथल्या वायु साठ्याचे नमूने काकिनाडा इथल्या प्रयोगशाळेत आणून तपासल्यावर त्यात 87 % मिथेन वायू आढळून आला.

 मिशन समुद्र

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या संदर्भात ट्विट करून सविस्तर माहिती दिली. अंदमान निकोबार बेटांवर आणि समुद्रात उर्जेचे प्रचंड प्रमाणात साठे असल्याचे वैज्ञानिकांना माहिती आहेच. पण त्यांचे शोध अजून लागले नव्हते. पण आता श्री विजयपूरम इथे नैसर्गिक वायुचा शोध लागल्यानंतर अंदमान निकोबार पासून‌ ते म्यानमारच्या किनारपट्टी पर्यंतचा हजारो मैलांचा टापू ऊर्जेच्या शोधासाठी खुला झाला आहे. या परिसरात फक्त नैसर्गिक वायूचे साठेच नाहीत, तर तेलही मोठ्या प्रमाणात आढळून येऊ शकते, असे वैज्ञानिकांचे अनुमान आहे. त्यामुळे भविष्यात भारताची ऊर्जेची गरज भारतीय साधनांनीच पूर्ण होऊ शकते. पण त्यासाठी आणखी शोधांची आणि आर्थिक गुंतवणुकीची गरज आहे. मोदी सरकारने त्यासाठी मिशन समुद्र सुरू केले आहे. अंदमानच्या समुद्रात खोलवर ऊर्जेचे प्रचंड साठे आढळून येणे हा मिशन समुद्राच्या अनेक टप्प्यांपैकी एक टप्पा आहे. भारताचे अंदमान क्रांति तीर्थ आहेच, ते आता नवे ऊर्जा तीर्थ देखील बनले आहे.

India’s Kranti Tirtha Andaman now becomes a Natural Wind Power Tirtha!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment