Trending News

No trending news found.

Friday, 17 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
माहिती जगाची

Indian youth : भारतीय तरुण मतपेटीची ताकद मानतो..नेपाळसारखा उठाव अशक्य!!

नेपाळमध्ये जनरेशन झेडच्या आंदोलनाने ओली सरकारचा पाडाव केला आणि संपूर्ण देश हादरला. भारतातही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र तज्ज्ञांच्या मते भारतीय तरुणाईची मानसिकता, सामाजिक रचना आणि संस्थात्मक ताकद यामुळे नेपाळसारखा उठाव भारतात होणे जवळपास अशक्य आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Indian youth नेपाळमध्ये जनरेशन झेडच्या आंदोलनाने ओली सरकारचा पाडाव केला आणि संपूर्ण देश हादरला. भारतातही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र तज्ज्ञांच्या मते भारतीय तरुणाईची मानसिकता, सामाजिक रचना आणि संस्थात्मक ताकद यामुळे नेपाळसारखा उठाव भारतात होणे जवळपास अशक्य आहे.Indian youth

इतिहासात याचा एक संदर्भ मिळतो. आसाममध्ये १९७९ मध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने राज्य सरकार उलथून टाकले होते. प्रफुलकुमार महंत यांच्या नेतृत्वाखालील या चळवळीतून तरुणच थेट सत्तेत आले. मात्र ते आंदोलन प्रादेशिक होते आणि विशिष्ट परिस्थितीतून उभं राहिलं होतं. राष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारचा उठाव आजच्या काळात शक्य नाही, यावर जाणकारांचा ठाम भर आहे.Indian youth

भारतीय जनरेशन झेड ही सोशल मीडियाच्या युगातली पिढी आहे. ती कोणत्याही घोषणांवर आंधळेपणाने विश्वास ठेवत नाही; प्रत्येक मुद्दा तपासून, प्रश्न विचारून मगच भूमिका घेते. त्यामुळे “लोकशाही धोक्यात आहे” किंवा “वोट चोरी झाली” अशा घोषणांनी लाखो युवक रस्त्यावर उतरतील, अशी अपेक्षा व्यर्थ आहे.Indian youth



याशिवाय भारताची सेना पूर्णपणे अपराजकीय असून ती फक्त राज्यघटनेशी निष्ठावान आहे. पोलिस आणि देखरेख यंत्रणा सशक्त असल्याने नेपाळप्रमाणे रस्त्यावरचं आंदोलन शासन उलथून टाकेल, असं वास्तवात होणं शक्य नाही.

दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुका हा नाराजी व्यक्त करण्याचा कायदेशीर मार्ग आहे. त्यामुळे असंतोष मतपेटीतून व्यक्त होतो. करिअरचा दबाव, परीक्षांचे टार्गेट्स, नोकरीसाठीची धडपड आणि कुटुंबीयांच्या अपेक्षा यामुळे तरुणाईला पोलिस प्रकरणं किंवा गुन्हेगारी नोंदींचा धोका पत्करायचा नसतो.

युवक आपली नाराजी डिजिटल माध्यमातून मीम्स, रील्स, हॅशटॅग्सद्वारे व्यक्त करतात. हा सुरक्षित आणि जलद मार्ग आहे. नेपाळने सोशल मीडियावर बंदी घालून आंदोलन रस्त्यावर ढकललं, पण भारतात अशी चूक होत नाही.

भारतामधील असंतोष जाती, प्रांत, भाषा आणि विचारधारेनुसार विखुरलेला आहे. त्यामुळे सर्वांचा एकमुखी “सरकार बदला” घोषणेत रूपांतर होणं कठीण आहे. भारतीय कुटुंब व समाज स्थैर्याला जास्त महत्त्व देतात. मुलं क्लास बुडवून आंदोलनात गेली तर पालकच त्यांना घरी खेचून आणतात.

तरुणाईच्या आंदोलनाने सरकारं बदलू शकतात, हे आसाम आणि नेपाळमध्ये दिसलं. पण राष्ट्रीय स्तरावर भारतात तसं होण्याची शक्यता नाही. कारण भारतीय युवक जागरूक, व्यावहारिक आणि आपल्या भविष्यासंबंधी गंभीर आहे. बदल हवा असेल तर त्यासाठी मतपेटी हाच एकमेव मार्ग आहे, हे त्यांना ठाऊक आहे.

Indian youth believes in the power of the ballot box.. An uprising like Nepal is impossible!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment