Trending News

No trending news found.

Wednesday, 11 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

भारतीय बॅटिंगच्या सुनामीत न्यूझीलंड गेले वाहून; भारत सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन!!

- संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि शिवम दुबेची तुफानी फटकेबाजी!!

– संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि शिवम दुबेची तुफानी फटकेबाजी!!

विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय बॅटिंगच्या सुनामी मध्ये न्यूझीलंड वाहून गेले. संजू सॅमसन अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि शुभम दुबे यांनी तुफानी फटकेबाजी करून नरेंद्र मोदी स्टेडियम डोक्यावर घेतले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल दाखवत भारताला 2026 मध्ये सलग दुसऱ्यांदा वर्ड चॅम्पियन बनविले. भारताने केलेल्या 255 धावांचा पाठलाग करताना न्युझीलँडची टीम 159 धावांमध्ये गुंडाळली. त्यांचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजी पुढे फार मोठी चमक दाखवू शकला नाही.

किंबहुना विश्वचषकाच्या अंतिम सामना बराच निरस झाला. कारण न्यूझीलंडच्या टीमने भारताचा खऱ्या अर्थाने मुकाबलाच केला नाही. सामन्या दरम्यान कुठल्याही क्षणी चुरस निर्माण झाली नाही. भारतीय फलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व गाजविले ते अखेरपर्यंत कायम राहिले. न्युझीलँडची अख्खी टीम संपूर्ण सामना दबावाखाली खेळली. ते भारतीय टीमच्या दबावातून बाहेरच येऊ शकले नाहीत.

भारताने 2007 2024 आणि 2026 अशा तीन वर्षांमध्ये t20 विश्वचषक जिंकत विक्रमी इतिहास रचला. महेंद्रसिंग धोनी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या तीन कर्णधारांनी भारताला उत्तम नेतृत्व देत विश्वचषक जिंकला.

न्युझीलँडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजीला बोलाविले, याचा त्याला पाश्चाताप झाला कारण संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या 5 षटकांमध्येच पावर प्ले दाखवत न्यूझीलंडला झोडपून काढले. त्यांनी न्यूझीलंडच्या कुठल्याच गोलंदाजाला सोडले नाही. संजू सॅमसन यांनी 89 अभिषेक शर्माने 52 ईशान किशन ने 54 आणि शिवम दुबे याने शेवटच्या षटकांमध्ये 20 धावा काढून भारताचा 255 धावांचा डोंगर उभा केला.

– जेम्स निशामच्या 3 विकेट्स

जेम्स निशाम याने एका ओव्हरमध्ये तीन विकेट घेऊन थोडा थरार निर्माण करायचा प्रयत्न केला. त्याने ईशान किशन हार्दिक पंड्या आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांना बाद केले. पण तोपर्यंत संपूर्ण सामन्यावर भारताची पकड बसली होती. शेवटच्या चार षटकांमध्ये 19 धावा निघाल्या, पण शेवटच्या षटकामध्ये शिवम दुबे याने तुफान फटकेबाजी करून जेम्स निशामकडून 20 धावा वसूल केल्या. शुभम दुबे याने 26 धावा केल्या. त्याला तिलक वर्माने सहा धावा काढून साथ दिली. त्यामुळे भारताचा 255 धावांचा डोंगर झाला. न्यूझीलंड पुढे 256 धावांचे मोठे आव्हान उभे राहिले.

– अभिषेकने ठरविला विश्वास सार्थ

अंतिम सामन्याच्या आधी अभिषेक शर्माला संघातून वगळायचा दबाव वाढला होता, पण कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेकला संघातून वगळले नाही. अभिषेकने सूर्यकुमार यादवचा विश्वास सार्थ ठरविला. त्याने 18 बॉल मध्ये 52 धावा ठोकल्या.

India wins T20 cricket 2026 final

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment