Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

Howard Lutnick अमेरिकेला एक ट्रम्प नाही पुरला म्हणून दुसरा पुढे आला; भारत अमेरिकेला sorry म्हणेल, असा दावा केला!!

अमेरिकेला एक ट्रम्प नाही पुरला म्हणून दुसरा पुढे आला; भारत अमेरिकेला sorry म्हणेल, असा त्याने दावा केला!! ट्रम्प प्रशासनाचे डोके फिरलेले आहे असेच म्हणायची वेळ वेगवेगळ्या दाव्यांमुळे आली.

Howard Lutnick अमेरिकेला एक ट्रम्प नाही पुरला म्हणून दुसरा पुढे आला; भारत अमेरिकेला sorry म्हणेल, असा त्याने दावा केला!! ट्रम्प प्रशासनाचे डोके फिरलेले आहे असेच म्हणायची वेळ वेगवेगळ्या दाव्यांमुळे आली. डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार इतर नावारो यांनी भारतातल्या ब्राह्मणांच्या नावाने खडे फोडले. भारत रशियाकडून स्वस्त तेल घेतो. ते तेल जगाला विकतो आणि त्याचा फायदा भारतातले ब्राह्मण उपटतात, असा दावा पीटर नावारो यांनी करून भारतातल्या जातिवादी राजकारणाला खतपाणी घातले.

त्यांच्या आधी आणि नंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ युद्धामध्ये तेल ओतून ते भडकवले. डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अकाउंट वर अर्धसत्य लिहिले. अमेरिकेने भारत आणि रशिया यांना चीनच्या खोल आणि अंधाऱ्या गर्तेत गमावले, असे ट्रम्प म्हणाले. पण प्रत्यक्षात त्यांनी भारत आणि रशिया यांना चीनच्या खोल आणि अंधाऱ्या गर्तेत स्वतःहून लोटून दिले. पण पुढचे हे सत्य ट्रम्प यांनी सांगितले नाही.

पण अमेरिकेला एकच डोनाल्ड ट्रम्प पुरला नाही की काय म्हणून दुसरा डोनाल्ड ट्रम्प पुढे आला. आणि त्याने ट्रम्प यांच्या पुढचा शॉट हाणला. ट्रम्प यांनी ट्रूथ अकाउंट वर अर्धसत्य लिहिल्यानंतर अमेरिकेचे व्यापार मंत्री हावर्ड ल्यूटनिक यांनी बुलुम्बर्गला दिलेल्या मुलाखतीत भारताविषयी ट्रम्प यांच्यासारखाच उथळ आणि अजब दावा केला. तुम्ही आमच्या बाजूने आहात का समोरच्या बाजूने आहात हे भारताला लवकर ठरवावे लागेल. भारत लवकरच अमेरिकेला sorry म्हणेल अमेरिकेने लादलेले ज्यादा टेरिफ स्वतःहून भरू लागेल. पुढच्या दोन-तीन महिन्यांमध्ये हे घडेल. भारत वाटाघाटींच्या टेबलवर येऊन अमेरिकेला sorry म्हणेल, असा दर्पयुक्त आणि अहंकारी दावा हावर्ड ल्यूटनिक यांनी केला. अमेरिकेला एक डोनाल्ड ट्रम्प पुरला नाही म्हणून हा हावर्ड ल्यूटनिक नावाचा दुसरा डोनाल्ड ट्रम्प पुढे आला.



हावर्ड ल्यूटनिक यांनी बुलुम्बर्गच्या मुलाखतीत फक्त भारत sorry म्हणेल एवढाच दावा करून ते थांबले नाहीत. त्या पलीकडे जाऊन त्यांनी आणखी अजब दावे केले. अमेरिका 30 अब्ज डॉलर्सचे मोठे मार्केट आहे. भारत आणि चीन हे दोन्ही देश अमेरिकेला अनेक वस्तू विकतात पण ते एकमेकांना वस्तू विकू शकत नाहीत. अमेरिकेसारख्या मोठ्या मार्केटला गमावणे भारत आणि चीन यांना परवडणार नाही कारण अमेरिका फार मोठा जगाचा ग्राहक आहे आणि शेवटी ग्राहकच बरोबर असतो हे भारत आणि चीन यांना मान्य करावे लागेल, असा दावा हावर्ड ल्यूटनिक यांनी केला.

रशिया आणि युक्रेन यांच्यातले युद्ध सुरू होण्यापूर्वी भारत रशियाकडून फक्त 2 % तेल घेत होता. पण युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने 31 % पर्यंत तेल आयात वाढवली. रशियाला डॉलर्स द्यायला सुरुवात केली. त्यामुळे युद्ध भडकले. भारत रशियाकडून तेल घेणे थांबवत नाही, तोपर्यंत अमेरिका ज्यादा टेरिफ लादत राहील. भारताला ते ज्यादा टेरिफ भरावे लागेल. हे किती काळ चालेल सांगता येत नाही, असा दावा देखील हावर्ड ल्यूटनिक यांनी केला.

वास्तव काय??

– वास्तविक अमेरिका जरी जगातला मोठा ग्राहक असला तरी तो एकमेव ग्राहक नाही. शिवाय भारत आणि चीन हे दोन्ही देश अमेरिकेला वस्तू विकतात आणि एकमेकांना वस्तू विकतच नाहीत हा दावा तर जाम खोटा आहे. कारण भारत आणि चीन यांच्यातला 118.4 बिलियन डॉलर्सचा आहे. त्यामध्ये चीनचा भारतातला निर्यातीचा वाटा फार मोठा असून भारतही निर्यातीचा आपला वाटा वाढवायचा निकराने प्रयत्न करत आहे.

– अमेरिकेचा कृषी बाजार कोसळला आहे. अमेरिकेची कृषी उत्पादने आयात करणे चीन, जपान यांनी थांबविले आहे. या दोन्ही देशांनी ब्राझील आणि भारत हे दोन नवे कृषी उत्पादने निर्यातदार शोधले आहेत. अमेरिकेला भारतात सगळी कृषी उत्पादने निर्यात करायची आहेत. पण भारत ती स्वीकारायला तयार नाही. भारताला अमेरिकेचे दूध आणि अन्य दुग्धजन्य पदार्थ नको आहेत. पण तरीही अमेरिकेला कृषी आणि दुग्धजन्य उत्पादने भारतात रेटून dump करायची आहेत.

– याच मुद्द्यांवर भारत आणि अमेरिका यांच्यातला थेट व्यापार करार अडून राहिला आहे. ज्यादा टेरिफ लादून, भारतातली राजवट बदलून, भारतात सामाजिक आणि आर्थिक अस्वस्थता निर्माण करून अमेरिका भारताला झुकवू शकेल, असा ट्रम्प प्रशासनाचा होरा आहे. पण भारतात कुठलीही राजवट असली तरी एका विशिष्ट मर्यादेनंतर भारत अमेरिके पुढे झुकलेला नाही, हा इतिहास आणि वर्तमान आहे मग भविष्य काय असेल??

India will say sorry in 2 months: Trump aide Howard Lutnick on tariffs

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment