Trending News

No trending news found.

Saturday, 10 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

नाशकात भाजपने आमदारांच्या घरातली तिकिटे कापली; पण विधानसभेच्या आयाराम अध्यक्षांच्या घराणेशाहीवर मेहेरबानी!!

आमदार खासदारांच्या मुलांना तिकिटे दिली जाणार नाहीत असे धोरण भाजपने नाशिक मध्ये जाहीर केले.

नाशिक : आमदार खासदारांच्या मुलांना तिकिटे दिली जाणार नाहीत असे धोरण भाजपने नाशिक मध्ये जाहीर केले. त्यामुळे आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलाचे आणि आमदार सीमा हिरे यांच्या मुलीचे तिकीट पक्षाने कापले. दोघांनी भरलेले उमेदवारी अर्ज त्यांना मागे घ्यायला लावले. पण नाशिक मध्ये आमदारांची घराणेशाही तोडणाऱ्या भाजपने मुंबई आणि पुण्यात घराणेशाहीवर तिकिटांची खैरात केली. मुंबईत विधानसभेच्या आयाराम अध्यक्षांच्या घराणेशाहीवर मेहरबानी केली. त्यांच्या घरातल्या तिघांना उमेदवारी बहाल केली. त्यामुळे भाजपच्या धोरणावर सोशल मीडियातून जोरदार टीकेची झोड उठली.

भाजपने नेहमीच घराणेशाहीच्या विरोधात पुकारा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून सगळ्यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर सातत्याने प्रहार केला. पण स्थानिक पातळीवरच्या घराणेशाही पासून भाजप सुद्धा वाचू शकला नाही. लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने. सूर्यवंशीच्या एकाच घरातल्या सहा लोकांना तिकिटे दिली होती परंतु, मतदारांनी या घराणेशाहीला असा काही दणका दिला की त्यांनी सहाच्या सहा उमेदवार पराभूत केले.



– नाशिक मध्ये आमदारांच्या मुलांची तिकिटे कापली

या पराभवातून धडा घेऊन भाजपने नाशिक मध्ये आमदारांच्या मुलांची तिकिटे कापली. देवयानी फरांदे यांच्या मुलगा अजिंक्य फरांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण त्याला तो माघारी घ्यायला लावला. सीमा हिरे यांची मुलगी सिद्धी हिरे हिने सुद्धा अर्ज दाखल केला होता. पण पक्षाने तिला सुद्धा माघार घ्यायला लावली. मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या दोन आमदारांना दणका दिल्याचे बोलले गेले.

– आयाराम अध्यक्षांवर मेहरबानी

पण याच भाजपने विधानसभेचे आयाराम अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर मेहरबानी केली. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई असलेले राहुल नार्वेकर काही मूळचे भाजपचे नेते नव्हेत. ते आधी शिवसेनेतून आणि नंतर राष्ट्रवादीतून फिरून भाजपमध्ये आले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट विधानसभेचे अध्यक्ष केले. पण त्या पलीकडे जाऊन मुंबईत भाजपने राहुल नार्वेकरांच्या सगळ्या घराण्यावर मेहरबानी केली. राहुल नार्वेकरांचे बंधू मकरंद नार्वेकर यांना प्रभाग क्रमांक 225 मधून, राहुल नार्वेकरांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर यांना 226 मधून, तर राहुल नार्वेकरांची चुलत बहीण गौरवी नार्वेकर शिवलकर यांना 227 मधून उमेदवारी जाहीर केली.

– पुण्यात भाजपची घराणेशाही

पुण्यात सुद्धा भाजपने मोठी घराणेशाही चालविली. गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, मुक्ता टिळकांचा मुलगा कुणाला टिळक, रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे, नीलिमा खाडे यांचा मुलगा अपूर्व खाडे यांना तिकिटे दिली.

– घराणेशाहीवर प्रहार केल्याचा आव

भाजपने घराणेशाही विरुद्ध प्रहार केल्याचा आव नाशिक मध्ये आणला पण मुंबई आणि पुण्यात मात्र तो गळून गेला. त्यामुळे सोशल मीडियावरून भाजपवर जोरदार टीकेची झोड उठली.

In Nashik, the BJP denied tickets to the relatives of sitting MLAs

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment