Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

संघ शताब्दी : 100 रुपयांच्या नाण्यावर भारत मातेची तसबीर; काँग्रेस + समाजवादी + कम्युनिस्टांच्या fake narrative वर मात!!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त देशभर आणि जगभरात अनेक कार्यक्रम होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजधानी नवी दिल्लीतल्या संघ शताब्दीच्या कार्यक्रमात सहभागी झाले.

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त देशभर आणि जगभरात अनेक कार्यक्रम होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजधानी नवी दिल्लीतल्या संघ शताब्दीच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी 100 रुपयांच्या नाण्याचे आणि टपाल तिकिटाचे अनावरण केले. रिझर्व बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या शंभर रुपयांच्या नाण्यावर भारत मातेची वरद मुद्रेतील तसबीर अंकित आहे, तर टपाल तिकिटावर संघाचे स्वयंसेवक 1963 साली दिल्लीतल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झाले होते, त्याचा फोटो आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघाच्या शताब्दी निमित्त 100 रुपयांचे नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण करून काँग्रेस, समाजवादी आणि कम्युनिस्टांचे fake narrative एकाच झटक्यात उद्ध्वस्त करून टाकले. एकेकाळी काँग्रेसची कम्युनिस्ट आणि समाजवादी यांनी संघाला राजकीय दृष्ट्या “अस्पृश्य” ठरवून दुहेरी सदस्यत्वाचा वाद घातला होता. जनता पक्षाचे मोरारजीभाई देसाई यांचे सरकार घालविले होते. जनसंघाच्या त्या वेळच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अपराधबोधात घातले होते. त्यावेळी संघ आणि जनसंघाला बॅकफूटवर ढकलण्यात काँग्रेसी, समाजवादी आणि कम्युनिस्ट हे यशस्वी ठरले होते.

परंतु कालचक्र असे फिरले की राजकीय दृष्ट्या वर उल्लेख केलेले तिन्ही घटक irrelevant ठरले आणि संघ आणि त्यांचा परिवार political most relevant ठरले. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या 100 रुपयाच्या नाण्यावर भारत मातेची वर्गमुद्रेतील तस्वीर अंकित होणे हे त्याचेच प्रतिक ठरले.

भारत मातेच्या तसबीरीची कम्युनिस्टांना ऍलर्जी

काहीच दिवसांपूर्वी कुठल्याही सरकारी कार्यक्रमात भारत मातेची तसबीर नको. कारण ती संघाची प्रतिक आहे, असा दावा करून केरळ मधल्या कम्युनिस्ट सरकारने तिथले राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याशी वाद घातला होता. केरळच्या राजभवनात सुद्धा भारत मातेची तसबीर सरकारी कार्यक्रमात ठेवता कामा नये असा तिथल्या कम्युनिस्ट यांच्या सरकारने दंडक घालायचा प्रयत्न केला होता. परंतु राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी तो मानला नाही आणि त्यांनी राजभवनातल्या कार्यक्रमात भारत मातेच्या पूजन केले. त्यानंतर कम्युनिस्टांनी त्याच मुद्द्यावर राजभवनाच्या समोर मोठे आंदोलन केले होते.

नाण्या संदर्भात चालणार नाही fake narrative

संघाने स्वीकारलेली कुठलीही प्रतीके ही “जातीय”, “धर्मांध” आणि “देशविरोधी” असल्याचे fake narrative काँग्रेस, समाजवादी आणि कम्युनिस्टांनी वर्षानुवर्षे चालविले होते. त्यांचे भारताच्या राजकारणात आणि समाजकारणात ज्यावेळी पूर्ण वर्चस्व होते, तेव्हा ते fake narrative चालून गेले. परंतु, आता जेव्हा देश + काल + परिस्थिती एवढी बदलली की ते fake narrative टप्प्याटप्प्याने उद्ध्वस्त होत गेले. आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत मातेची वरद मुद्रा असलेल्या 100 रुपयांच्या नाण्याचे अनावरण केले, त्यावेळी कुठल्याही काँग्रेसी, कम्युनिस्ट अथवा समाजवाद्याने त्याविरुद्ध कुठलाही आवाज उठवण्याची हिंमत दाखवली नाही. किंबहुना ते हिंमत दाखवू शकले नाहीत. रिझर्व्ह बँकेने जारी केलेले 100 रुपयांचे हे नाणे काँग्रेसी, समाजवादी आणि कम्युनिस्ट यांनी वापरायचे नाही असे ठरविले तरी काही बिघडणार नाही. कारण काही झाले तरी रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत नाण्याला ते त्यांच्या fake narrative ने “अनधिकृत” ठरवू शकणार नाहीत!!

Fake narrative of Congress, Samajwadi and communist destroyed

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment