Trending News

No trending news found.

Friday, 9 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

मी बोलायचे ठरविले तर…; फडणवीसांचा अजितदादांना पुन्हा इशारा; महेश लांडगेंना बूस्टर डोस!!

उपमुख्यमंत्री अजित पवार विकासाच्या मुद्द्यावर बोलायचे सोडून वाद निर्माण करत आहेत. महायुतीतल्या सहयोगी पक्षावर किती आणि कसे बोलायचे हे त्यांनी ठरविले पाहिजे. अन्यथा मी बोलायचे ठरविले तर मी काय बोलू शकतो, कसे बोलू शकतो आणि कशी उत्तरे देऊ शकतो, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अशा परखड शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पुन्हा एकदा इशारा दिला. फडणवीसांनी या इशाऱ्यातून आमदार महेश लांडगे यांना बूस्टर डोस दिला.

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार विकासाच्या मुद्द्यावर बोलायचे सोडून वाद निर्माण करत आहेत. महायुतीतल्या सहयोगी पक्षावर किती आणि कसे बोलायचे हे त्यांनी ठरविले पाहिजे. अन्यथा मी बोलायचे ठरविले तर मी काय बोलू शकतो, कसे बोलू शकतो आणि कशी उत्तरे देऊ शकतो, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अशा परखड शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पुन्हा एकदा इशारा दिला. फडणवीसांनी या इशाऱ्यातून आमदार महेश लांडगे यांना बूस्टर डोस दिला.Fadnavis warns Ajitdada again; Booster dose for Mahesh Landage!

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी विषयी देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केले.

– देवेंद्र फडणवीस म्हणाले :

– आपल्या सहयोगी पक्षावर टीका करताना काय बोलायचे याचा विचारा अजित पवारांनी केला पाहिजे. माझा स्वभाव कसा आहे हे सगळ्यांना माहिती आहे मी जर बोलायचे ठरविले तर मी काय बोलू शकतो, किती बोलू शकतो, कशी उत्तरे देऊ शकतो, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. टीकेला उत्तर द्यायचे नाही ही माझी दबावाखालची भूमिका नाही. कारण मला निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर ठेवायची आहे म्हणून मी सध्या काही बोलत नाही.



– अजित पवारांना ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याच्या बाहेर न्यायची आहे म्हणून ते वाद निर्माण करत आहेत. सकाळी वाद सुरू करायचा आणि दिवसभर त्याची चर्चा घडवत राहायची अशी त्यांची रणनीती दिसते, पण आम्ही तसे होऊ देणार नाही. आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर बोलत राहून मते मिळवू.

– भाजप विरोधात एकट्याच्या बळावर निवडणूक लढवता येणार नाही म्हणून अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बरोबर घेतले. पण पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी भाजपच एक नंबरला राहील. अजित पवार किंवा शरद पवारांना एक नंबर होण्याची संधी नाही. आमची सत्ता आल्यानंतरच दोन्ही महापालिकांमध्ये विकासाची गती वाढली, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

– एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आमची नैसर्गिक युती आहे पण बेरजेचे राजकारण करण्यासाठी आम्ही अजित पवारांना बरोबर घेतले त्यांच्या बऱ्याच भूमिका नंतर बदलल्या आहेत.

– महेश लांडगेंना बूस्टर डोस

देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतला ही मुलाखत देऊन पिंपरी चिंचवड मधल्या भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना बूस्टर डोस दिला. अजित पवारांनी भाजपवर टीका करताना स्थानिक नेतृत्व म्हणून महेश लांडगे यांनाच टार्गेट केले. पत्रकार परिषदेत यांनी महेश लांडगे यांच्या दादागिरीचा पाढा वाचला.

त्यानंतर महेश लांडगे यांनी अजितदादांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. पण बाकीच्या नेत्यांनी त्याविषयी कुठले भाष्य केले नव्हते. पण आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मुलाखत देऊन महेश लांडगे यांचे मुद्दे उचलून धरले त्यामुळे पिंपरी चिंचवड मध्ये अजितदादांच्या विरोधात लढायला आणि बोलायला महेश लांडगे यांना बूस्टर डोस मिळाला.

Fadnavis warns Ajitdada again; Booster dose for Mahesh Landage!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment