Trending News

No trending news found.

Sunday, 11 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

CM Fadnavis : धारावी कोणा खासगी व्यक्तीला दिली नाही, प्रत्येक धारावीकराला घर मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या ३० वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू होत्या, मात्र आमच्या सरकारने प्रत्यक्ष कृती करून प्रत्येक धारावीकराचे पुनर्वसन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. धारावीकरांना केवळ घरेच नाही, तर एक समृद्ध आर्थिक इकोसिस्टिमही आम्ही उपलब्ध करून देणार आहोत," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी येथे केले. यावेळी त्यांनी धारावी कोणत्या खासगी व्यक्तीला दिली नसल्याचे स्पष्ट करत, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : “CM Fadnavis धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या ३० वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू होत्या, मात्र आमच्या सरकारने प्रत्यक्ष कृती करून प्रत्येक धारावीकराचे पुनर्वसन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. धारावीकरांना केवळ घरेच नाही, तर एक समृद्ध आर्थिक इकोसिस्टिमही आम्ही उपलब्ध करून देणार आहोत,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी येथे केले. यावेळी त्यांनी धारावी कोणत्या खासगी व्यक्तीला दिली नसल्याचे स्पष्ट करत, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.CM Fadnavis

धारावीत ‘एसआरए’ (झोपडपट्टी पुनर्वसन योजना) राबवण्यास मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट नकार दिला. “एसआरए राबवला असता तर केवळ उभ्या झोपड्या तयार झाल्या असत्या. आम्हाला एक झोपडी तोडून दुसरी तशीच उभी करायची नाही, तर धारावीचा सर्वांगीण विकास करायचा आहे. नव्या डिझाइननुसार पात्र नागरिकांना ३५० चौ. फुटांचे मोठे घर मिळेल. या परिसरात उद्याने, मैदाने आणि सर्व आधुनिक सोयी असतील. विशेष म्हणजे, नागरिकांना देखभालीचा खर्च लागणार नाही, अशी व्यवस्था केली जाईल,” असे फडणवीस म्हणाले.CM Fadnavis



आर्थिक विकासावर भर आणि करमाफी

धारावीच्या बहुरंगी संस्कृतीचे आणि मेहनती लोकांचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले की, धारावी ही केवळ झोपडपट्टी नसून एक मोठी आर्थिक शक्ती आहे. येथील चर्मोद्योग, कुंभारवाडा आणि फूड इंडस्ट्रीला धक्का न लावता त्यांना अधिक बळ दिले जाईल. पुनर्विकासानंतर पुढची ५ वर्षे राज्य सरकारचे कर माफ केले जातील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

धारावी कोणत्या खासगी व्यक्तीला दिली नाही

धारावी कोणाला दिली नाही, ती कोणत्या खासगी व्यक्तीला दिली नाही. डीआरपी, एसआरए हिस्सेदारी आहे. कोणी विकासक लाटेल असं होणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. इतक्या वर्षात विरोधकांना विचारा, तुम्ही काय केले? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. प्रत्येक धारावीकरांना आम्ही घर दिल्याशिवाय राहणार नाही. मोदीजींना आम्ही आणतो उद्घाटन आपण करुयात. एआयडीएमकेने भाजपला संपूर्ण समर्थन दिले आहे, ते देखील प्रचारात उतरतील असेही फडणवीस म्हणाले.

विरोधकांच्या सूडाच्या राजकारणावर प्रहार

स्वतःला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रयत्नांवर भाष्य करताना फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “मला अडकवण्यासाठी तत्कालीन सरकारकडून एसआयटी तयार करण्यात आली होती. त्या रिपोर्टमधून आता अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत. वरील सूचनेवरून तत्कालीन अधिकारी आणि पोलीस आयुक्त कसे काम करत होते, नसलेल्या केसेस कशा तयार केल्या जात होत्या, हे आता उघड झाले आहे. मात्र, त्यांचे सूडाचे राजकारण यशस्वी झाले नाही.”

Dharavi Not Handed to Private Person; Every Resident to Get 350 sq ft House: CM Fadnavis PHOTOS VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment