Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
Uncategorized

Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात अडचणी नाहीत; भुजबळांशी चर्चा करून नाराजी दूर करू!

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले होते. 5 दिवसांच्या उपोषणानंतर अखेर राज्य सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाने जीआर देखील काढला आहे. परंतु, या जीआरला ओबीसी नेत्यांनी विरोध केला असल्याचे दिसत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या जीआरच्या निषेधार्थ आजच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला होता. या सगळ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Eknath Shinde मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले होते. 5 दिवसांच्या उपोषणानंतर अखेर राज्य सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाने जीआर देखील काढला आहे. परंतु, या जीआरला ओबीसी नेत्यांनी विरोध केला असल्याचे दिसत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या जीआरच्या निषेधार्थ आजच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला होता. या सगळ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.Eknath Shinde

एकनाथ शिंदे म्हणाले, हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर आपल्या सरकारने काढला आहे. याबद्दल सविस्तर मी बोललो आहे तसेच मुख्यमंत्री सुद्धा बोलले आहेत. यामध्ये जो निर्णय आम्ही घेतला आहे तो कायद्याच्या चौकटीत बसवून घेतला आहे. त्यामुळे जी काही पद्धत आहे मराठा समाजातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जी प्रक्रिया आहे ती अधिक सोपी करणे सुलभ करणे याचा उल्लेख जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे मला असे वाटते की त्याची अंमलबजावणी करण्यात कुठलीही अडचण येणार नाही आणि कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळेल.Eknath Shinde



भुजबळ साहेबांची नाराजी दूर होईल

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, हे सगळे करत असताना ओबीसी समाजाचे कुठलेही नुकसान होणार नाही, अशी भूमिका सरकारची सुरुवातीपासून आहे. छगन भुजबळ यांच्याशी आम्ही बोलू, मुख्यमंत्री देखील बोलतील आणि जो काही निर्णय घेण्यात आला आहे, त्याची जी काही वस्तुस्थिती आहे त्यांना समजाऊन सांगू. मला वाटते आपण जो काही निर्णय घेतलेला आहे त्याची माहिती आणि वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर भुजबळ साहेबांची नाराजी दूर होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

भुजबळ कॅबिनेट बैठकीला गैरहजर

छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे नाराज झाल्याने त्यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी झालेल्या पक्षाच्या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित होते. मात्र कॅबिनेट बैठकीला हजर नसल्याचे चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. मात्र मराठा आरक्षणाच्या जीआरला त्यांचा विरोध असून ते त्याविरोधात कोर्टात जाणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच मला वाटत आहे की काही लोक म्हणत होते की हरकती मागवायला हव्या होत्या.काही लोक म्हणतात की ते यांना अधिकार आहे का? आता पाहू ते सगळ आता आम्ही विचार करतो. असा निर्णय होईल अशी आम्हाला काय कुणालाच अपेक्षा नव्हती, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

Eknath Shinde Says No Problems in Giving Kunbi Certificates to Marathas

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment