Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहिले सत्तेपासून वंचित; मधल्या मध्ये ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने ठाकरेंच्याच खासदारांना सत्तेच्या चांदीचे वेध!!

दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण टाळल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहिले सत्तेपासून वंचित; पण मधल्या मध्ये ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने ठाकरेंच्याच खासदारांना लागले सत्तेच्या चांदीचे वेध!!, अशा महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींची चर्चा महाराष्ट्रात रंगली.

नाशिक : दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण टाळल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहिले सत्तेपासून वंचित; पण मधल्या मध्ये ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने ठाकरेंच्याच खासदारांना लागले सत्तेच्या चांदीचे वेध!!, अशा महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींची चर्चा महाराष्ट्रात रंगली.Eknath Shinde operation tiger may bring Thackeray MPs to power fold

अजित पवार यांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवार यांची राष्ट्रवादी कब्जात घेण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचे फुगे महाराष्ट्राच्या राजकीय हवेत सोडून दिले होते. त्यामध्ये मराठी माध्यमांनी भरपूर हवा भरली. त्यामुळे ते उंच उंच उडाले. पण प्रत्यक्षात भाजपच्या नेतृत्वाने आणि सुनेत्रा पवारांनी त्या फुग्यांना टाचणी लावल्याने दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचे फुगे फटाफट फुटले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार या सगळ्यांना सत्तेपासून वंचित राहावे लागले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि सुनेत्रा पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हाता तोंडाशी आलेला सत्तेचा घास काढून घेतला.



– ऑपरेशन टायगरची चर्चा

पण याच दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याच्या निमित्ताने ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या दीड तासांच्या चर्चेमुळे या ऑपरेशन टायगरला जोरदार हवा मिळाली. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ऐवजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार आणि आमदार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसतात की काय, यावर मोठा खल सुरू झाला. या चर्चेला मराठी माध्यमांनी हवा दिली पण संजय राऊत यांनीही चर्चाच नाकारली. शिंदेंच्या सेनेकडून ऑपरेशन टायगर वगैरे काही सुरू नाही कारण त्यांची ती क्षमता नाही. उलट एकनाथ शिंदे यांच्या सेनेमध्ये अंतर्गत ऑपरेशन सुरू आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

– काँग्रेसचे खासदार शिंदेंच्या संपर्कात

पण संजय राऊत यांचा दावा राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी वेगळ्या मार्गाने फेटाळून लावला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत की नाही माहिती नाही पण काँग्रेसचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत असे सांगून उदय सामंत यांनी नवाच राजकीय फुगा हवेत उडवून दिला. त्यामुळे महाविकास आघाडीतली राजकीय दरी आणखी रुंदावली.

पण ते काही असले तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या उतावळ्या नेत्यांना भाजपने आणि सुनेत्रा पवारांनी सत्तेपासून वंचित ठेवले पण नरेंद्र मोदींनी एकनाथ शिंदे यांना भेट देऊन उद्धव ठाकरेंच्या खासदारांना आणि काँग्रेसच्या खासदारांना सत्तेच्या चांदीचे वेध लावून ठेवले, एवढे मात्र निश्चित घडले!!

Eknath Shinde operation tiger may bring Thackeray MPs to power fold

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment