Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

भरपूर भडकावू बडबडीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सौम्य सूर; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील बदलला नूर; पण…

भरपूर भडकावू बडबडीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी काढला सौम्य सूर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील बदलला नूर; पण म्हणून मोदींनी आपली ठाम भूमिका बदलून अमेरिकेचा दौरा करायचे निश्चित केले,

भरपूर भडकावू बडबडीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी काढला सौम्य सूर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील बदलला नूर; पण म्हणून मोदींनी आपली ठाम भूमिका बदलून अमेरिकेचा दौरा करायचे निश्चित केले, असे काही घडले नाही. त्या उलट मोदींनी सप्टेंबर मधला दौरा रद्द करून आपल्या ऐवजी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनाच संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेच्या भाषणासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला.

– आंतरराष्ट्रीय संकेत झुगारणारी भाषा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमने भारताच्या विरोधात भरपूर नकारात्मक बडबड करून घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी तर अनेकदा आंतरराष्ट्रीय संकेत आणि सभ्यता झुगारणारी भाषा केली. ट्रम्प प्रशासनातील सगळ्या मंत्र्यांनी भारताविरुद्ध वाटेल तशी आगपाखड करून घेतली. यामध्ये पीटर नावारो, हावॉर्ड ल्यूटनिक यांचा अग्रक्रमाने समावेश राहिला. ट्रम्प यांनी भारतावर 50% टेरिफ लादला. त्यातले 25% दंड ठेवला. हे सगळे एकतर्फी सुरू होते. पण भारत आपल्या ठाम भूमिकेवरून किंचितही बाजूला झाला नाही. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबविली नाही. भारताने BRICS मधली सदस्यता रद्द केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला SCO समिटमध्ये जायचे थांबले नाहीत. उलट या तीनही बाबी भारताने ठामपणे पूर्ण केल्या आणि पूर्ण करत राहिला. या सगळ्यात भारतीय नेतृत्वाने ट्रम्प आणि त्यांच्या टीमची बडबड हवेतल्या हवेत उडवून लावली. भारतातल्या कुठल्याही मंत्र्यांनी अनावश्यक नकारात्मक बडबड केली नाही. अमेरिकेच्या व्यापार कराराच्या कुठल्याही अटी मान्य केल्या नाहीत.



– ट्रम्पचे सूर बदलले

पण आपण एवढी बडबड आणि आदळ आपट करून सुद्धा भारतीय प्रशासन जराही हलले नाही. आपली नोबेल पुरस्कारासाठी शिफारस देखील केलेली नाही, हे लक्षात येताच डोनाल्ड ट्रम्प यांची सूर बदलले. ते सौम्य झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते “ग्रेट” म्हणाले. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध special relationship आहे, असे म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही वाक्य उच्चारण्यापूर्वी दोन-तीन तासच आधी त्यांचे व्यापारमंत्री हावर्ड ल्यूटनिक यांनी भारताने माफी मागावी भारताला माफी मागायला लागेल, अशी दमबाजी केली. पण भारताने त्यांच्या बडबडीकडे लक्ष दिले नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने उलट ती बडबड उडवून लावली.

– मोदींचे सकारात्मक उत्तर, पण…

या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ग्रेट म्हटले भारताबरोबर अमेरिकेची special relationship आहे असे म्हणाले. काळजीचे कारण नाही, अशीही पुस्ती जोडली. ट्रम्प यांच्या या वक्तव्याला पंतप्रधान मोदींनी पाच ओळींचे ट्विट करून सकारात्मक उत्तर दिले. भारत आणि अमेरिका यांच्यात चांगले राजनैतिक संबंध आहेत आणि ते तसेच पुढे चालू राहतील, असा आशावाद मोदींनी व्यक्त केला. पण त्यापलीकडे जाऊन मोदींनी अमेरिकेचा रद्द केलेला दौरा पुन्हा सुरू केला नाही. त्यांनी अमेरिकेला जायचे निश्चित केले नाही त्या उलट त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत भारताचे प्रतिनिधित्व करून भाषण करायला पाठविण्याचे निश्चित केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला नकारात्मक बडबड केली त्यावेळी मोदींनी त्यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही ज्यावेळी ट्रम्प यांनी सूर बदलले आणि ते सौम्य केले त्यावेळी मोदींनी पाच ओळींचे ट्विट करून त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला, पण मोदी धोरणात्मक बाबींमध्ये अमेरिकेपुढे बिलकूल झुकले नाहीत. त्यांनी अमेरिकेला आणि ट्रम्प प्रशासनाला पाहिजे असलेल्या गोष्टी मान्य केल्या नाहीत. अमेरिकेबरोबरची सकारात्मक working relationship सुरू राहील, याची “व्यवस्था” मात्र त्यांनी व्यवस्थित करून ठेवली.

Donald Trump praise Modi, PM Modi reciprocates with caution

महत्वाच्या बातम्या

 

 

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment