Trending News

No trending news found.

Sunday, 14 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

Dheeraj Seth : भारतीय लष्कराला नवे नेतृत्व! लेफ्टनंट जनरल धीरज सेठ होणार नवे लष्करप्रमुख; 40 वर्षांच्या अनुभवाची केंद्राकडून दखल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : Dheeraj Sethभारतीय लष्कराच्या सर्वोच्च पदासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून विद्यमान उपसेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची नवे लष्करप्रमुख (Chief of Army Staff) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते विद्यमान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेणार आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्यांची उपसेनाप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.Dheeraj Seth जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा कार्यकाळ संपणार जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी 30 जून 2024 रोजी भारतीय लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांचा कार्यकाळ जून 2026 मध्ये पूर्ण होत असून त्यानंतर धीरज सेठ यांच्याकडे भारतीय सैन्याची धुरा सोपवण्यात येणार आहे. लष्करप्रमुखांचा कार्यकाळ तीन वर्षांचा किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत […]

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Dheeraj Sethभारतीय लष्कराच्या सर्वोच्च पदासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून विद्यमान उपसेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची नवे लष्करप्रमुख (Chief of Army Staff) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते विद्यमान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेणार आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्यांची उपसेनाप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.Dheeraj Seth

जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा कार्यकाळ संपणार

जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी 30 जून 2024 रोजी भारतीय लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांचा कार्यकाळ जून 2026 मध्ये पूर्ण होत असून त्यानंतर धीरज सेठ यांच्याकडे भारतीय सैन्याची धुरा सोपवण्यात येणार आहे. लष्करप्रमुखांचा कार्यकाळ तीन वर्षांचा किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो.Dheeraj Seth



चार दशकांचा अनुभव; संवेदनशील भागांमध्ये नेतृत्व

डिसेंबर 1986 मध्ये आर्मर्ड कोअरमध्ये कमिशन मिळाल्यानंतर धीरज सेठ यांनी तब्बल 40 वर्षे भारतीय लष्करात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. जम्मू-काश्मीर, पश्चिम सीमेवरील संवेदनशील भाग आणि वाळवंटी क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण नेतृत्व केले आहे.

ते दक्षिण-पश्चिम कमांड आणि दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (GOC-in-C) म्हणूनही कार्यरत होते. पश्चिम आघाडीवरील दोन महत्त्वाच्या ऑपरेशनल कमांडचे नेतृत्व करणाऱ्या मोजक्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते.

संयुक्त राष्ट्र मिशनचाही अनुभव

धीरज सेठ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या अंगोला मिशनमध्येही काम केले आहे. तसेच सैन्य मुख्यालय, क्षमता विकास आणि धोरणात्मक नियोजनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यामुळे ऑपरेशनल आणि प्रशासकीय अशा दोन्ही क्षेत्रांतील त्यांचा अनुभव व्यापक मानला जातो.

शिक्षणातही अव्वल

लेफ्टनंट जनरल सेठ हे खडकवासला येथील National Defence Academy, देहरादून येथील Indian Military Academy, वेलिंग्टनमधील Defence Services Staff College आणि National Defence College चे माजी विद्यार्थी आहेत.

ज्युनियर कमांड कोर्समध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच DSSC मध्ये ‘बेस्ट ऑल राऊंड स्टुडंट ऑफिसर’ हा प्रतिष्ठेचा सन्मानही त्यांना मिळाला आहे.

अनेक प्रतिष्ठित पदकांनी सन्मानित

उत्कृष्ट आणि उल्लेखनीय सेवेसाठी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांना परम विशिष्ट सेवा पदक (PVSM), उत्तम युद्ध सेवा पदक (UYSM) आणि अति विशिष्ट सेवा पदक (AVSM) यांसारख्या प्रतिष्ठित सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.

बदलत्या सुरक्षा आव्हानांमध्ये मोठी जबाबदारी

सीमेवरील वाढती आव्हाने, आधुनिक युद्धतंत्रज्ञान, स्वदेशी संरक्षण क्षमता आणि थिएटर कमांडसारख्या महत्त्वाच्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर धीरज सेठ यांच्यावर भारतीय लष्कराचे नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि धोरणात्मक नेतृत्वाचा फायदा भारतीय सैन्याला पुढील काळात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Lt Gen Dheeraj Seth Appointed Next Indian Army Chief to Succeed Gen Upendra Dwivedi

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment