Trending News

No trending news found.

Saturday, 7 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

DGCA : डीजीसीएचा निर्णय- अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर व्हीएसआरच्या 4 विमानांवर उड्डाणबंदी

बारामतीजवळ गेल्या महिन्यात व्हीएसआर व्हेंचर्सचे विमान दुर्घटनाग्रस्त होऊन त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चौकशी करत असलेल्या डीजीसीएला अनेक त्रुटी आढळल्यानंतर त्यांनी आता व्हीएसआर व्हेंचर्सच्या ४ विमानांची उड्डाणे थांबवली आहेत. या अपघातानंतर व्हीएसआर व्हेंचर्सचे विशेष सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात आले होते.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : DGCA बारामतीजवळ गेल्या महिन्यात व्हीएसआर व्हेंचर्सचे विमान दुर्घटनाग्रस्त होऊन त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चौकशी करत असलेल्या डीजीसीएला अनेक त्रुटी आढळल्यानंतर त्यांनी आता व्हीएसआर व्हेंचर्सच्या ४ विमानांची उड्डाणे थांबवली आहेत. या अपघातानंतर व्हीएसआर व्हेंचर्सचे विशेष सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात आले होते.DGCA

नॉन-शेड्युल्ड विमानांच्या सुरक्षेत चूक झाल्यास कारवाई

दरम्यान, डीजीसीएने सोमवारी झारखंडमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताच्या पार्श्वभूमीवर आदेश जारी केले आहेत. हे उड्डाण अनौपचारिक श्रेणीतील होते, ज्यात ७ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता विमानन नियामक डीजीसीएने नॉन शेड्यूु्ड विमान चालकांसाठी कडक सुरक्षा नियम लागू केले आहेत. हे असे चालक असतात, ज्यांच्या उड्डाणांचे कोणतेही निश्चित वेळापत्रक किंवा ठरलेला मार्ग नसतो.DGCA



डीजीसीएने म्हटले की, भाड्याने घेतलेली विमाने (चार्टर प्लेन) किंवा खासगी हेलिकॉप्टर कंपन्यांमध्ये नियमांचा कोणताही मोठा निष्काळजीपणा आढळला, तर त्यासाठी कंपनीचे मोठे अधिकारी आणि जबाबदार व्यवस्थापकांना वैयक्तिकरिी्या दोषी मानून त्यांच्यावर कारवाई होईल. सुरक्षेतील त्रुटींसाठी फक्त वैमानिकांना जबाबदार धरले जाऊ शकत नाही. अशा चालकांच्या विमानांचे वय, देखभाल-दुरुस्तीचा इतिहास यासारखी माहितीदेखील सार्वजनिक केली जाईल.

DGCA Ban VSR Ventures Aircraft Ajit Pawar Death VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment