विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis दहा मनपात भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ६८ तर मालेगावात इस्लाम पक्षाचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला. त्यानंतर ७२ तासांनी विरोधकांनी त्यावर आगपाखड करत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी कधी होणार हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, बिनविरोधवरून सुरू झालेला वाद अजून पेटलेलाच आहे. या प्रकरणात पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिखट हल्ला केला.Devendra Fadnavis
धुळे येथील प्रचारसभेत ते म्हणाले की, धुळ्यात आमचे ४ बिनविरोध आले. यामुळे काही लोकांना मिरची लागत आहे. त्यांना मी एवढेच सांगेन की, तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं?’ याआधी काँग्रेसच्या काळात लोकसभेत ३३ खासदार बिनविरोध निवडून आले होते, असे सांगून जर खासदार बिनविरोध आले, तर लोकशाही जिवंत आणि धुळेकरांनी चार नगरसेवक बिनविरोध दिले, तर लोकशाहीचा खून झाला, असे म्हणणाऱ्यांचे डोके कुठे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही, असे ते म्हणाले.Devendra Fadnavis
दरम्यान, कुलाबा येथे अर्ज बाद प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरुद्ध आठ उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर ठाण्यातील प्रकरणात निवडणूक अधिकारी वृषाली पाटील यांना हटवण्यासाठी मनसेने ठाणे मनपा आयुक्तांना २४ तासांचा (७ जानेवारीपर्यंत) अल्टिमेटम दिला आहे.
ठाण्यात शिंदेसेनेचे तिघे बिनविरोध
ठाण्यातील तीन उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांनी चुकीच्या पद्धतीने बाद केले. त्यांच्यावर २४ तासांत कारवाई करावी, अशी मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मनपा आयुक्त सौरभ राव यांच्याकडे मंगळवारी केली. जाधव म्हणाले की, पाटील यांच्यामुळे शिंदेसेनेच्या ३ उमेदवारांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे पाटील यांच्या सर्व प्रॉपर्टीची सखोल चौकशी केली पाहिजे.
नार्वेकरांच्या आदेशाने अर्ज फेटाळल्याचा आरोप
दरम्यान, विधानसभाध्यक्ष नार्वेकरांच्या आदेशावरून उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वीकारले नाहीत, असा आरोप आठ उमेदवारांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात केला. या याचिकेत त्यांचे वॉर्ड क्रमांक २२४ ते २२७ साठीचे अर्ज स्वीकारण्याचे निर्देश निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपद आणि राजकीय अधिकाराचा गैरवापर करून मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीत हस्तक्षेप केला. उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या आवारातून हाकलून लावण्यास भाग पाडले. आयोगाने आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले, असा दावा याचिकेत आहे. मंगळवारी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर, गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर ही याचिका तातडीने सुनावणीसाठी आली. परंतु न्यायालयाने सांगितले की ती योग्य वेळी सुनावणीसाठी घेतली जाईल. या प्रकरणात नार्वेकरांचे भाऊ मकरंद, बहीण गौरी शिवलकर आणि मेहुणी हर्षिता शिवलकर २२५, २२६ आणि २२७ या वॉर्डमधून निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, नार्वेकर म्हणाले की, हे आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत.
हिरव्या लोकांच्या जवळ गेलेल्या उद्धवसेनेने मनसेचा ताबा घेतला : धुरी
दरम्यान, भाजपत प्रवेश केलेले मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी म्हणाले की, ज्यांच्यामुळे पक्ष फुटला, त्यांनाच राज यांनी जवळ केले, हे पाहून वाईट वाटते. राज ठाकरे हिरव्या लोकांच्या जवळ गेलेल्यांच्या जवळ गेले. त्या लोकांनी (उद्धव ठाकरे) पूर्णपणे पक्षाचा ताबा घेतला आहे. मनसे राज ठाकरेंनी सरेंडर केला.
आयोगाच्या डोळ्यात ‘गारगोट्या’ गेल्या आहेत का? : खा. संजय राऊत
उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “या बिनविरोध निवडणुका सरळ मार्गाने झालेल्या नाहीत. धमकी, पैसा आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून उमेदवारांना अर्ज भरू दिले नाहीत. बबन महाडिक यांच्यासारखे उमेदवार रांगेत उभे असतानाही विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे त्यांचे अर्ज घेतले गेले नाहीत. निवडणूक आयोगाच्या डोळ्यांच्या खाचा झाल्या आहेत का? की डोळ्यात गारगोट्या गेल्या आहेत?
Devendra Fadnavis Hits Back at Opposition Over Unopposed Wins in Civic Polls
महत्वाच्या बातम्या
- केवळ सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजितदादांना घेरून ते वठणीवर येतील??
- ठाकरे आणि पवार ब्रँड लै मोठे; तर ते मुंबई, ठाण्यात आणि पुणे, पिंपरी – चिंचवड मध्येच का अडकलेत??
- Chandrakant Patil : अजितदादा जनता खुळी नाही; तुमची सत्ता असताना विकास का नाही केला? चंद्रकांत पाटलांचा पलटवार
- पुण्यातला काँग्रेसचा अखेरचा धुरंधर!!



Post Your Comment