Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचा विकास, पर्यटन आणि वारसा संवर्धनाला चालना; 681 कोटी रुपयांची तरतूद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळ, चौंडी (अहिल्यानगर) येथील जतन आणि संवर्धन विकास आराखड्यासंदर्भात बैठक संपन्न झाली.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळ, चौंडी (अहिल्यानगर) येथील जतन आणि संवर्धन विकास आराखड्यासंदर्भात बैठक संपन्न झाली. Ahilyadevi Holkar

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श कायम स्मरणात राहणारा आहे. त्यांच्या जीवनकार्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने चौंडी गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक विकासकामे हाती घेण्यात आलेली आहेत. चौंडीचा विकास सर्वसमावेशक व नियोजनबद्ध पद्धतीने करत दर्जेदार सुविधांच्या माध्यमातून पर्यटनास चालना देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.



681 रुपयांची तरतूद

चौंडी येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी ₹681 कोटींची तरतूद करण्यात आली असून, या प्रकल्पांतर्गत स्मारक परिसरात भव्य पुतळा, सुशोभित उद्यान, नदीकाठाचा विकास, आधुनिक संग्रहालय, ओपन एअर थिएटर आणि पर्यटन सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. स्मारक परिसरात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता करण्यासाठी जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात यावा. तसेच हरित क्षेत्र आणि मोकळ्या जागांचा समतोल राखत परिसराचे सौंदर्यीकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

‘बॅरेज’ उभारण्याबाबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. मंदिर परिसरातील भूसंपादन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करावे. प्रकल्पातील काही सुविधा उभारणी आणि देखभालीसाठी खासगी भागीदारी (पीपीपी मॉडेल) आणण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असून, यामुळे पर्यटन सुविधा अधिक दर्जेदार, कार्यक्षम व दीर्घकालीन टिकाऊ पद्धतीने विकसित करता येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ₹360 कोटींच्या रस्ते प्रकल्पातील दोन कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक जागेच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी वन, सार्वजनिक बांधकाम, जलसिंचन विभाग आणि ग्रामपंचायत यांनी संयुक्त मोजणी केली असून सीमारेषा निश्चित करण्यात आल्या आहेत. चौंडी येथील स्मारकाचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने आणि टप्प्याटप्प्याने केला जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमुद केले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Development of Ahilyadevi Holkar Memorial: Boosting Tourism and Heritage Conservation

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment