Trending News

No trending news found.

Saturday, 7 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

संख्याबळ पाहता आदित्य ठाकरेंची भूमिका होती योग्य; संजय राऊत यांचे शिवसेनेच्या जखमेवर मलम की मीठ??

महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी हो - नाही, नाही - हो, असे करत अखेरीस शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

नाशिक : महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी हो – नाही, नाही – हो, असे करत अखेरीस शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. पण त्यानंतर आज संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे वक्तव्य केले ते पाहता त्यांनी शिवसेनेच्या जखमेवर मलम लावले की मीठ चोळले??, असा सवाल समोर आला.

– पवारांनी शिवसेनेच्या मदतीची परतफेड नाही केली

संजय राऊत यांनी पहिल्यापासूनच शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीची वकालत केली होती, पण आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांच्यासारख्या तरुण आमदारांनी एकट्या शिवसेनेनेच महाविकास आघाडी साठी किती त्याग करायचा??, असा सवाल विचारून शरद पवारांच्या उमेदवारीत खोडा घातला होता. वास्तविक आदित्य ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य होती. कारण फौजिया खान यांच्या निवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी शिवसेनेलाच विनंती करून त्यांच्या हक्काची जागा फौजिया खान यांच्यासाठी घेतली होती. फौजिया खान यांच्या निवडीमुळे राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेपेक्षा मोठा पक्ष ठरला होता. 2026 च्या राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांनी शिवसेनेने केलेल्या मदतीची परतफेड करायला हवी होती, पण त्याऐवजी त्यांनी स्वतःचीच उमेदवारी संजय राऊत यांच्या तोंडून पुढे रेटली. त्यासाठी त्यांनी एकीकडे भाजपला डोळा मारणे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीत फूट पाडणे, अशी दुहेरी खेळी केली. शरद पवारांनी महाविकास आघाडी कडून आपली उमेदवारी पदरात पाडून घेतली. वास्तविक सध्याचे विधानसभेतले संख्याबळ पाहता शिवसेनेचे 20 काँग्रेसचे 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फक्त 10 आमदार आहेत पण तरीसुद्धा शरद पवारांनी स्वतःच्या ज्येष्ठतेच्या बुरख्याखाली शिवसेनेला दुसऱ्यांदा माघार घ्यायला लावली.



– शिवसेनेच्या जखमेवर सोडले मीठ

आज राज्यसभेच्याच निवडणुकीच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांची भूमिका संख्याबळ पाहता योग्यच होती, असे वक्तव्य केले. पण हे वक्तव्य करून संजय राऊत यांनी शिवसेनेच्या जखमेवर मलम लावले, की मीठ चोळले??, असा सवाल तयार झाला. कारण राज्यसभेच्या जागेवर आता फक्त शिवसेनेचा हक्क आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दहाच आमदार आहेत हे संजय राऊत यांना माहिती असताना त्यांनी सुरुवातीपासूनच शरद पवारांचे नाव लावून धरले होते आणि आता जेव्हा शरद पवारांच्या राज्यसभेच्या जागेवर शिक्कामोर्तब झाले त्यावेळी संजय राऊत यांनी मानभावी किंवा शहाजोगपणाने वक्तव्य करून शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले.

Considering the numerical strength, Aditya Thackeray’s role was appropriate.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment