Trending News

No trending news found.

Saturday, 7 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश‌ चेन्निथला यांचा उद्धव ठाकरेंना फोन; शरद पवारांचा पत्ता राज्यसभेतून परस्पर कट!!

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आज उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि शरद पवारांचा पत्ता राज्यसभेतून परस्पर कट केला. ही महत्त्वाची राजकीय घडामोड आज घडली. काँग्रेसने महाराष्ट्रातल्या राज्यसभा जागेवर आपला अधिकार सांगितला. त्याच्या बदल्यात उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेची ऑफर दिली. पण त्यामुळे शरद पवारांचा राज्यसभेत जाण्याचा मनसूबा काँग्रेसने परस्पर उधळून लावला.

 

नाशिक : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आज उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि शरद पवारांचा पत्ता राज्यसभेतून परस्पर कट केला. ही महत्त्वाची राजकीय घडामोड आज घडली. काँग्रेसने महाराष्ट्रातल्या राज्यसभा जागेवर आपला अधिकार सांगितला. त्याच्या बदल्यात उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेची ऑफर दिली. पण त्यामुळे शरद पवारांचा राज्यसभेत जाण्याचा मनसूबा काँग्रेसने परस्पर उधळून लावला.Congress Maharashtra in-charge Ramesh Chennithala calls Uddhav Thackeray; Sharad Pawar’s address is a mutual cut from Rajya Sabha!!

– पवारांच्या बाजूने फक्त एकटे राऊत

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पहिल्यापासून महाविकास आघाडीचे “एकमेव” उमेदवार म्हणून शरद पवारांचे नाव पुढे रेटले होते. पण आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई या शिवसेनेच्या दोन तरुण आमदारांनी शरद पवारांच्या नावाला छेद दिला. या दोघांनीही शिवसेनेचे राज्यसभेची हक्काची जागा सोडायला नकार दिला. त्या पाठोपाठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसचा हक्क सांगितला. पण शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली, तर आमचा नाईलाज होईल, अशी कबुली सुद्धा त्यांनी देऊन ठेवली.



– रमेश चेन्निथलांनी फिरवली game

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आज उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि काँग्रेससाठी राज्यसभेची जागा सोडण्याची विनंती केली. राज्यसभेच्या जागेच्या बदल्यात काँग्रेस शिवसेनेसाठी विधान परिषदेची जागा सोडेल, अशी ऑफर ही दिली. रमेश चेन्निथला यांच्यासारख्या काँग्रेसच्या हायकमांडचे प्रतिनिधी असलेल्या नेत्याने थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करून त्यांना ऑफर दिल्याने शरद पवारांचा राज्यसभेतला पत्ता परस्पर कटला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावे, असा आग्रह सुद्धा रमेश चेन्निथला यांनी धरला. रमेश चेन्निथला यांच्या एका फोनमुळे महाराष्ट्रातले महाविकास आघाडीतले सगळे सत्ता समीकरणच बदलून गेले. काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतून परस्पर बाहेर फेकली गेली. खुद्द शरद पवार यांचे राजकीय दृष्ट्या “जड” असलेले नाव सुद्धा त्यांची राजकीय प्रतिष्ठा टिकविण्यात उपयोगी ठरले नाही.

– खर्गे आणि पवारांमध्ये स्पर्धा

राज्यसभेतून शरद पवार आणि फौजिया खान असे दोन राष्ट्रवादीचे खासदार निवृत्त होत आहेत. त्याचबरोबर काँग्रेसच्या रजनी पाटील आणि शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी सुद्धा निवृत्त होत आहेत. काँग्रेसने रजनी पाटील यांची जागा मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासाठी मागितली असून, ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले, तर काँग्रेसचे राज्यसभेतले विरोधी पक्ष नेतेपद टिकेल. शरद पवार जसे राष्ट्रवादीसाठी ज्येष्ठ नेते आहेत तसेच मल्लिकार्जुन खर्गे हे सुद्धा त्यांच्याच एवढे ज्येष्ठ आणि महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यातच राजकीय स्पर्धा लागली असून ज्येष्ठता आणि दोन्ही पक्षांची सर्व प्रकारची क्षमता, या राजकीय निकषांवर शरद पवारांच्या पुढे मल्लिकार्जुन खर्गे यांचेच पारडे जड ठरते.

Congress Maharashtra in-charge Ramesh Chennithala calls Uddhav Thackeray; Sharad Pawar’s address is a mutual cut from Rajya Sabha!!

महत्वाच्या बातम्या

 

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment