Trending News

No trending news found.

Tuesday, 9 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!

काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!, ही राजकीय घडामोड आज घडली.

नाशिक : काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!, ही राजकीय घडामोड आज घडली.

काँग्रेसने ममता बॅनर्जींच्या विनंतीवरून नवी दिल्लीत “इंडी” आघाडीची बैठक घेतली त्या बैठकीला 25 पेक्षा जास्त पक्षांना निमंत्रित केले. 25 पक्षांचे बैठकीला उपस्थित राहिले. ही माहिती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीमध्ये सगळ्या विरोधकांची पाच मुद्द्यांवर सहमती सुद्धा झाली. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, मतांच्या चोरीबद्दल सरन्यायाधीशांना पत्र लिहायचे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा किंवा त्यांना काढून टाकायचे, आदी मुद्द्यांवर सर्व विरोधकांनी एकमत केले. उद्धव ठाकरेंनी तर पंतप्रधान पदाचा मुद्दा बाहेर काढून काँग्रेस आणि इतर पक्षांना चकविले. पण उद्धव ठाकरे सोडून त्या मुद्द्यावर कुणी बोलले नाही. किंबहुना बाकीच्या पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान पदाचा मुद्दा टाळला.

– TVK पक्षाला निमंत्रण द्यायचे टाळले

पण काँग्रेस तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या TVK पक्षाबरोबर सत्तेमध्ये आहे. काँग्रेसचे दोन आमदार मंत्री आहेत. तरीसुद्धा काँग्रेसने विजय जोसेफ यांच्या TVK पक्षाला “इंडी” आघाडीच्या बैठकीत निमंत्रण देणे टाळले. TVK पक्षाच्या एकही नेत्याला निमंत्रण दिले नाही. त्यामुळे त्या पक्षाचा एकही नेता बैठकीला हजर राहिला नाही. मात्र या संदर्भात काँग्रेसने अजब स्पष्टीकरण दिले. संसदेमध्ये ज्या पक्षाचे खासदार आहेत, त्याच विरोधी पक्षांना “इंडी” आघाडीच्या बैठकीसाठी निमंत्रण दिले होते, पण TVK पक्षाचा लोकसभेत किंवा राज्यसभेत एकही खासदार नाही. त्यामुळे त्या पक्षाच्या कुठल्या नेत्याला “इंडी” आघाडीच्या बैठकीसाठी निमंत्रण दिले नव्हते, असे स्पष्टीकरण काँग्रेसच्या नेत्यांनी दिले.



– काँग्रेसने काढली राजकीय इज्जत

याचा अर्थ तामिळनाडूमध्ये काँग्रेसला जोसेफ विजय यांच्या पक्षाबरोबर सत्तेसाठी आघाडी करण्यामध्ये रस आहे, पण केंद्रीय पातळीवर मात्र त्या पक्षाबरोबर आघाडी करायची नाही, हेच काँग्रेसचे धोरण असल्याचे आजच्या “इंडी” आघाडीच्या बैठकीतून आणि काँग्रेसच्या स्पष्टीकरणातून दिसून आले. तुमचा एकही खासदार नसल्याने तुम्हाला निमंत्रण दिले नाही, अशा शब्दांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी TVK पक्षाच्या नेत्यांची एक प्रकारे राजकीय इज्जत काढली. काँग्रेसचे तामिळनाडूमध्ये फक्त पाच आमदार निवडून आले, ते सुद्धा डीएमके पक्षाबरोबर आघाडी केल्यामुळे. पण विजय जोसेफ यांच्या TVK 106 आमदार निवडून आले. विजय जोसेफ यांना बहुमतासाठी काँग्रेसची गरज लागली म्हणून त्यांनी काँग्रेसशी जुळवून घेतले. पण काँग्रेसने मात्र तुमच्या पक्षाचा एकही खासदार नाही, असे सांगून TVK पक्षाच्या नेत्यांची राजकीय इज्जत काढली.

Congress decline to invite Vijay Joseph TVk party for India alliance meeting

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment