Trending News

No trending news found.

Friday, 17 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

GST सुधारणांना उशीर झाल्याबद्दल काँग्रेसने केली टीका; पंतप्रधान मोदींनी expose केली काँग्रेसच्या राजवटीतील GST भाराची भूमिका!!

बहुचर्चित GST सुधारणांना उशीर झाल्याबद्दल काँग्रेसने केली मोदी सरकारवर टीका, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी expose केली काँग्रेसच्या राजवटीतील GST लादायची भूमिका!!, असे राजकारणात दिल्लीत घडले.

नाशिक : बहुचर्चित GST सुधारणांना उशीर झाल्याबद्दल काँग्रेसने केली मोदी सरकारवर टीका, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी expose केली काँग्रेसच्या राजवटीतील GST लादायची भूमिका!!, असे राजकारणात दिल्लीत घडले.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, प्रवक्ते जयराम रमेश, शमा मोहम्मद यांनी जीएसटी सुधारणेतली खुसपटे काढून मोदी सरकारवर टीका केली. मोदी सरकारने जीएसटी मधून भरपूर पैसा कमवून झाल्यानंतर आठ वर्षांनी त्याच्यात सुधारणा केली, पण जगभरात सगळीकडे एकच कर असताना मोदी सरकारने दोन स्तरांमध्ये कर ठेवून सुधारणांसाठी आणखी वाव ठेवला. यातून राज्यांना जी नुकसान होणार आहे, त्याच्या भरपाईचा मोदी सरकारने अद्याप खुलासा केलेला नाही, असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला. मल्लिकार्जुन खर्गे आणि जयराम रमेश यांनी सोशल मीडिया अकाउंट वर मोठ मोठ्या पोस्ट लिहिल्या. तर बाकीच्या नेत्यांनी माध्यमांना बाईट दिले.

– काँग्रेस आणि बाकीच्या विरोधी पक्षांची गोची

पण मोदी सरकारने जीएसटीचे स्लॅब कमी करून जीवनावश्यक वस्तूंचे दर झटक्यात उतरविले. त्याविषयी काँग्रेसच्या नेत्यांना कुठलीही टीका करता आली नाही. कारण तशी टीका केली असती, तर ती काँग्रेस नेत्यांच्या अंगलट आली असती. त्यामुळे काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी जीएसटी मधल्या व्यवस्थेच्या बाबींवर भर देत टीकास्त्र सोडले. बाकीच्या विरोधी पक्षांची काँग्रेसच्या सारखीच अवस्था झाली. त्यामुळे त्या पक्षांनी सुद्धा जीएसटी सुधारणेचे स्वागत करून त्यातल्या फक्त व्यवस्थापकीय बाबींवर जाता जाता टीका करून घेतली. त्या पलीकडे काँग्रेस आणि बाकीच्या विरोधी पक्षांना जीएसटी सुधारणांवर काही नकारात्मक बोलता आले नाही.

– पंतप्रधान मोदींचे काँग्रेसला प्रत्युत्तर

पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी जमलेल्या शिक्षकांना काँग्रेसच्या राजवटीतली सगळी कर प्रणाली जाहीरपणे सांगून त्या पक्षाला expose केले. काँग्रेसच्या राजवटीच्या काळात टूथपेस्ट साबण केसांचे तेल अशा वस्तूंवर 27 % कर होता. खाद्यपदार्थ, प्लेट्स, चमचे, कप यांच्यावर 18 % ते 28 % कर होता. टूथपावडर वर 17 % टक्के कर होता. सायकलवर 17% कर होता. शिलाई मशीन वर 16% कर होता. लहान मुलांच्या टॉकीज वर 21% कर होता मोदींनी हे कर लावले असते, तर काँग्रेसवाल्यांनी केस उपटले असते. काँग्रेसवाल्यांनी मध्यमवर्गीयांचे जीवन हैराण केले होते. पण मोदी सरकारने मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गाचा विचार करून जीवनावश्यक वस्तूंवर फक्त 5 % GST ठेवला याकडे मोदींनी देशाचे लक्ष वेधले.

ऑनलाइन गेमिंग वर बंदी

देशातली तरुण पिढी ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली गॅम्बलिंग मध्ये वाया जात होती ती जुगार खेळत होती त्यामुळे सरकारने कायदा करून ऑनलाईन गेमिंग वर बंदी आणली अनेक मोठ्या शक्तींना भारतात अशी ऑनलाइन गेमिंग वर बंदी चालणार नव्हती त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी या बंदी विरोधात वातावरण निर्मिती केली होती पण आमच्या सरकारने राजकीय इच्छाशक्ती दाखवून ऑनलाईन गेमिंग वर बंदी आणायची शिल्लक ठेवली नाही ती बंदी आणलीच, असेही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.

Congress criticizes delay in GST reforms

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment