Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

तमिळ अस्मितेच्या राजकारणात अवघ्या 12 % वर वाताहत झालेल्या राष्ट्रीय पक्षांना आपल्या नेत्यांनाही सांभाळता येईना!!; एका खासदाराचा राजीनामा, दुसऱ्याचे तिकीट कापले!!

तमिळ अस्मितेच्या राजकारणात अवघ्या बारा टक्क्यांवर वाताहत झालेल्या दोन राष्ट्रीय पक्षांना आपापल्या नेत्यांना संभाळताही येईना, अशी अवस्था तमिळनाडूच्या राजकारणात येऊन ठेपली.

नाशिक : तमिळ अस्मितेच्या राजकारणात अवघ्या बारा टक्क्यांवर वाताहत झालेल्या दोन राष्ट्रीय पक्षांना आपापल्या नेत्यांना संभाळताही येईना, अशी अवस्था तमिळनाडूच्या राजकारणात येऊन ठेपली. एका खासदाराने नाराज होऊन राजीनामा दिला, तर दुसऱ्या महत्त्वाच्या नेत्याचे त्याच्या पक्षाने तिकीटच कापले. काँग्रेस आणि भाजप या पक्षांची ही अवस्था झाली. Congress and BJP

तामिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागांपैकी भाजप फक्त 27 जागांवर तर काँग्रेस 28 जागांवर निवडणूक लढवत आहे. म्हणजेच तामिळनाडूच्या एकूण राजकारणात या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा फक्त 12 % वाटा आहे. तरीसुद्धा या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना आपापल्या नेत्यांना संभाळायला कठीण जात आहे.

– मणिक्कम टागोरांचा राजीनामा

काँग्रेसचे तामिळनाडूतले खासदार मणिक्कम टागोर यांनी काँग्रेसवर नाराज होऊन निवडणूक प्रमुख पदाचा आणि समन्वयक पदाचा राजीनामा देऊन टाकला. पक्षाने त्यांच्याच मतदारसंघात त्यांचा प्रभाव असल्यास सात मतदार संघ द्रविड मुन्नेत्र कळघमला देऊन टाकले. पक्षाच्या प्रचाराचे नियोजन करताना टागोर विचारात घेतले नाही. त्यामुळे टागोर यांनी निवडणूक प्रमुख पदाचा आणि समन्वयक पदाचा राजीनामा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पाठवून दिला. त्यामुळे काँग्रेसवर निवडणूक प्रमुखाशिवाय निवडणूक लढवायची पाळी आली. काँग्रेसकडे लढविण्यासारख्या फक्त 28 जागा असताना पक्षाच्या नेतृत्वाला ज्येष्ठ खासदाराला सुद्धा सांभाळता आले नाही, तर पक्ष संघटना मजबूत करणे दूरच राहिले.

– अण्णामलाईंचे तिकीट कापले

एकीकडे काँग्रेसची ही अवस्था असताना दुसरीकडे भाजपने त्यांचे प्रभावी नेते के. अण्णामलाई यांचेच तिकीट कापले. तीन-चार वर्षांपूर्वीच भाजपने अण्णामलाई यांना अत्यंत प्रभावी नेता म्हणून तामिळनाडूमध्ये विकसित करायचे ठरविले होते. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी अण्णामलाई यांना पाठबळ सुद्धा दिले होते. तामिळनाडूतल्या दोन्ही प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाला त्यांनी तगडे आव्हान दिले होते. त्यांनी सगळ्यात तामिळनाडूमध्ये मोठी यात्रा देखील काढली होती. त्यामुळे अण्णामलाई यांची प्रतिमा तामिळनाडूचे भावी मुख्यमंत्री आणि केंद्रीय राजकारणातले प्रभावी नेते अशी तयार झाले होते.



– थातूरमातूर कारण

पण हे सगळे घडत असताना मध्येच मोठी राजकीय माशी शिंकली. भाजपने तामिळनाडू मध्ये जयललिता यांच्या अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाशी जुळवून घेतले. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्यांना अण्णामलाई अडचणीचे आणि जड वाटायला लागले. म्हणून भाजपने अण्णामलाई यांना दूर करून नागेंद्र यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष केले. त्यापुढे जाऊन अण्णामलाई यांचे विधानसभेचे तिकीट सुद्धा कापले. या मुद्द्यावरून मोठी राजकीय चर्चा सुरू होतात अण्णामलाई यांना एका मतदारसंघात अडकवणे बरोबर नाही. यांच्याकडे सगळ्या राज्याची प्रचाराची सूत्रे आहेत म्हणून त्यांचे तिकीट कापले, असे थातूरमातूर कारण दिले.

– भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे आडाखे चुकले

प्रत्यक्षात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे तामिळनाडूतले राजकीय आडाखे चुकले. अण्णामलाई यांच्या नेतृत्वाला विकसित होण्यासाठी त्यांनी पुरेसा वेळ दिला नाही आपल्या मित्र पक्षाच्या नादी लागून भाजपच्या नेत्यांनी अण्णामलाई यांचा राजकीय घात केला, हेच राजकीय वास्तव यानिमित्ताने समोर आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचा तामिळनाडूच्या राजकारणातला वाटा फक्त 12 % असताना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आपापल्या महत्त्वाच्या नेत्यांना संभाळता आले नाही त्याच्या पुढचे राजकीय वास्तव दोन्ही पक्षांना टोचून गेले.

Congress and BJP failed to satisfy their own leaders

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment