Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

गुलामीचे आणखी एक चिन्ह हटले; राष्ट्रपती भवनात एडवर्ड ल्यूटियन्सच्या जागी राजगोपालाचारींच्या पुतळ्याचे अनावरण!!

केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर राजधानी नवी दिल्लीतील गुलामीची अनेक चिन्हे हटवली. त्यामध्ये मुस्लिम बादशहांच्या नावांच्या रस्त्यांना भारतीय नेत्यांची नावे दिली.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर राजधानी नवी दिल्लीतील गुलामीची अनेक चिन्हे हटवली. त्यामध्ये मुस्लिम बादशहांच्या नावांच्या रस्त्यांना भारतीय नेत्यांची नावे दिली. त्याचबरोबर राजपथाचे नामकरण कर्तव्य पथ आणि राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन चे नामकरण अमृत उद्यान असे केले. त्यापाठोपाठ आज राष्ट्रपती भवनातल्या एडवर्ड ल्यूटियन्सच्या पुतळ्याच्या जागी भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री जयप्रकाश नड्डा, परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर, जलसंपत्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, राजगोपालाचारी चार यांचा पणतू सी. आर. केशवन, त्यांची पत्नी आणि लहान मुलगी त्याचबरोबर त्यांचे अन्य नातेवाईक राष्ट्रपती भवनात उपस्थित होते.

– मोदींची मन की बात

दिल्लीतली गुलामीची चिन्हे आम्ही हटवली. अजून काही गुलामीची चिन्हे शिल्लक आहेत. त्यापैकी एक राष्ट्रपती भवनात आजही आहे. एडवर्ड ल्यूटियन्सचा पुतळा तिथे उभा आहे. आम्ही लवकरच त्याच्या जागी चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा पुतळा उभा करू अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात केली होती. त्यानंतर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

Chakravarti Rajagopalachari Ji, widely known as Rajaji, at the historic central courtyard of Rashtrapati Bhavan

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment