Trending News

No trending news found.

Saturday, 7 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मका उत्पादकांना दिलासा; खरेदी मर्यादा आणि मुदतीत मोठी वाढ!!

खरीप कालावधीत मका खरेदीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा तसेच आधीच्या 66,000 मेट्रीक टनच्या मर्यादेत आणखी 50,000 मेट्रीक टन इतकी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : खरीप कालावधीत मका खरेदीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा तसेच आधीच्या 66,000 मेट्रीक टनच्या मर्यादेत आणखी 50,000 मेट्रीक टन इतकी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची मागणी आणि हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात 12 फेब्रुवारी 2026 रोजी एक पत्र लिहून केंद्र सरकारला विनंती केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे आभार मानले.central government, relief for maize producers; Big increase in purchase limit and deadline!!



– वीज प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील वीज पारेषण प्रकल्पांच्या प्रगती संदर्भात आढावा बैठक पार पडली. महाराष्ट्राच्या विकासाची गती पाहता राज्यात 2035 पर्यंत विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार असून, सर्व विकास प्रकल्पांना त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जनतेला अखंड वीज मिळावी यासाठी हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले.

– महावितरण IPo कडे

महावितरणने IPO आणून उत्पन्न वाढविण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील, याचे अधिकाऱ्यांनी आजच्या बैठकीत सादरीकरण केले. कॉर्पोरेट गव्हर्नर संदर्भात सुद्धा सादरीकरण करण्यात आले. IPO संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विशेष सूचना दिल्या.

central government, relief for maize producers; Big increase in purchase limit and deadline!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment