Trending News

No trending news found.

Sunday, 17 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Uttam Jankar : सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका जिंकण्यासाठी भाजपने पाठवले 300 कोटी रुपये, उत्तम जानकर यांचा आरोप

‘राष्ट्रप्रथम’ नाही तर ‘भ्रष्टप्रथम’ आणि ‘मुस्लिम खतम’ हेच भाजपचे नवे स्लोगन आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार उत्तम जानकर केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने तब्बल 300 कोटी रुपये पाठवले आहेत. प्रत्येक नगरपालिकेला किमान 25 कोटी रुपये वाटपासाठी आले असून, भाजप हा सध्याचा सर्वात भ्रष्ट पक्ष बनला आहे,"

विशेष प्रतिनिधी

सोलापूर: Uttam Jankar  ‘राष्ट्रप्रथम’ नाही तर ‘भ्रष्टप्रथम’ आणि ‘मुस्लिम खतम’ हेच भाजपचे नवे स्लोगन आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार उत्तम जानकर केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने तब्बल 300 कोटी रुपये पाठवले आहेत. प्रत्येक नगरपालिकेला किमान 25 कोटी रुपये वाटपासाठी आले असून, भाजप हा सध्याचा सर्वात भ्रष्ट पक्ष बनला आहे,” असा दावाही जानकर यांनी केला.Uttam Jankar

उत्तम जानकर यांनी एका प्रचारसभेत बोलताना उत्तम जानकर म्हणाले, ”सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने तब्बल 300 कोटी रुपये पाठवले आहेत. प्रत्येक नगरपालिकेला किमान 25 कोटी रुपये वाटपासाठी आले असून, भाजप हा सध्याचा सर्वात भ्रष्ट पक्ष बनला आहे.’Uttam Jankar



मी स्वतः 30 वर्षे भाजपमध्ये होतो. तेव्हा अटलबिहारी वाजपेयींच्या काळात ‘राष्ट्रप्रथम’ हे पक्षाचे ब्रीदवाक्य होते. मात्र, आताच्या भाजपमध्ये भ्रष्ट लोकांची भरती झाल्याने पक्षाची ‘गटारगंगा’ झाली आहे. आता ‘भ्रष्टप्रथम आणि मुस्लिम खतम’ हेच भाजपचे नवीन स्लोगन बनले आहे. तत्त्वशून्य राजकारण आणि केवळ भ्रष्टाचार, या एकाच मुद्द्यावर हे सर्व एकत्र आले आहेत.

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना जानकर म्हणाले, जिथे भाजप चौथ्या क्रमांकावर आहे, तिथे ‘कोणाचेही पैसे घ्या, पण मत आम्हाला द्या’, अशी लाचारीची भाषा पालकमंत्री वापरत आहेत. सध्या राज्यात तीन पक्षांच्या सरकारचे जे चित्र आहे ते फार काळ टिकणारे नाही, यातून लवकरच मोठा स्फोट झालेला दिसेल.

BJP Sent 300 Crore Rupees to Win Solapur Municipalities, Alleges Uttam Jankar

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment