Trending News

No trending news found.

Tuesday, 9 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

अटी शर्ती लादणाऱ्या भुजबळांना कात्रजचा घाट आणि पटेलांनीही केली पवारांवर “मात”!!

अटी शर्ती लादणाऱ्या भुजबळांना कात्रजचा घाट आणि पटेलांनीही केली पवारांवर "मात"!!, असेच राजकीय चित्र राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवारीच्या निमित्ताने समोर आले छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर अटी शर्ती लादून आपला कात्रजचा घाट करून घेतला.

नाशिक : अटी शर्ती लादणाऱ्या भुजबळांना कात्रजचा घाट आणि पटेलांनीही केली पवारांवर “मात”!!, असेच राजकीय चित्र राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवारीच्या निमित्ताने समोर आले छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर अटी शर्ती लादून आपला कात्रजचा घाट करून घेतला. त्याचवेळी राष्ट्रवादीत फक्त पवार कुटुंबाचे वर्चस्व लादून पटेल – तटकऱ्यांना बाजूला सारायचा डाव सुद्धा उधळला गेला.

सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी द्यायचे घाटत असताना छगन भुजबळ यांनी समीर भुजबळला मंत्री करायची अट घातली. राष्ट्रवादी काँग्रेस जणू काही स्वप्रतिभेने आणि स्वयं कर्तृत्वाने सत्तेवर असल्याचा थाट आणि आव छगन भुजबळ यांनी आणला आणि त्यांनी समीर भुजबळला मंत्री करायची अट घातली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या कोर्टात तो बॉल ढकलून भुजबळ यांना आधीच “इशारा” दिला होता. शेवटी व्हायचे तेच झाले. भुजबळांच्या अटी शर्ती भाजपने पाळायचे काहीच कारण नव्हते. भुजबळांच्या अटी शर्ती भाजपने पाळाव्यात एवढी भुजबळांची ताकदही उरलेली नाही आणि राष्ट्रवादी नावाच्या पक्षात सुद्धा त्यांची ताकद एवढी शिल्लक राहिलेली नाही. छगन भुजबळांना जे मिळायचे ते मिळून गेले आहे. त्यामुळे भाजपच्या श्रेष्ठींनी भुजबळांची अट फेटाळून त्यांना परस्पर कात्रजचा घाट दाखविला.



तटकरे – भुजबळ यांच्यातला फरक

सुनील तटकरे आपल्या मुलाला आमदारकी मिळवून देऊ शकतात, तर आपण आपल्या पुतण्याला मंत्रिपद का मिळवून देऊ शकत नाही, असे भुजबळ यांना वाटले, पण सध्याचे भाजप अंकित असलेले सुनील तटकरे निराळे आणि “पॉलिटिकल व्हॅल्यू” घसरलेले छगन भुजबळ निराळे. भाजपच्या प्रभावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सुनील तटकरे यांच्या मुलाला विधान परिषदेची आमदारकी द्यावी लागली, त्या उलट भुजबळांवर कात्रजचा घाट बघायची वेळ आली.

– पटेलांची पवार कुटुंबावर “मात”

पण त्याच वेळी प्रफुल्ल पटेल यांनी मुरब्बीपणे पवार कुटुंबावर “मात” केली. त्यांनी आपले एकेकाची पीए राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी मिळवून दिली. छगन भुजबळ यांचे नाव कटल्यावर बाकीची थोडीफार “हेवीवेट” नावे रेसमध्ये उरली होती, पण ती प्रफुल्ल पटेल यांनी बाजूला सारायला लावली. राष्ट्रवादी काँग्रेसवर फक्त पवार कुटुंबाचेच वर्चस्व लादण्यासाठी सुनेत्रा पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांना कात्री लावली होती. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेच पवार कुटुंबीयांच्या टार्गेटवर होते. त्यामुळे राष्ट्रवादीवर १०० % पवार कुटुंबीयांचीच पकड राहणार.

पार्थ पवार आता राष्ट्रवादी काँग्रेस चालविणार, असे मध्यंतरी चित्र निर्माण झाले होते, पण प्रफुल्ल पटेल यांनी याबाबतीत पवार कुटुंबियांवर “मात” केली. भाजपच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदतीने स्वतःचे राष्ट्रवादीतले स्थान टिकवून धरले आणि आपल्या समर्थकाला सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर पाठविले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वतःच्या अटी शर्तींवर काही चालणार नाही. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा फक्त पवार कुटुंबीयांच्या वर्चस्वावर चालणार नाही, तर इतर नेत्यांना सुद्धा विचारात घ्यावेच लागेल आणि त्यावर भाजपकडून अंतिम शिक्कामोर्तब करून घ्यावे लागेल, हाच राजकीय संदेश राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने बाहेर आला.

BJP and Prafulla Patel pushed back Pawar family politics

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment